Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Passed Away : दिलदार नेता हरपला…! सर्वच राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये दुर्दैवी अपघाती निधन झाले आहे. खासदार राऊत यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2026 | 10:50 AM
DCM Ajit Pawar Plan Crush Death MP Raut Nilesh Lanka paid tribute

DCM Ajit Pawar Plan Crush Death MP Raut Nilesh Lanka paid tribute

Follow Us
Follow Us:

Ajit Pawar Plane Crash : बारामती : राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. आज सकाळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले. त्यांना प्रतिक्रिया देणे देखील कठीण आहे.

हे देखील वाचा : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित

राज्यावर दुःखाचा डोंगर – संजय राऊत

अजित पवारांच्या मृत्यूवर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, हे बेचव आणि अळणी होईल. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा, रोखठोक, दिलखुलास असे अजित पवारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज राज्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे.” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

निलेश लंके यांची प्रतिक्रिया

खासदार निलेश लंके यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही खूप मोठी दुर्घटना आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी दुर्घटना घडली नाही, अजित पवार यांचे असे अकाली जाणे हा फक्त पवार कुटुंबाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान आहे, असे म्हणता साश्रू नयनांनी खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : टोमणे, चिमटे सरळ भाषेत सणसणीत वार; अजित पवारांचे गाजलेले डायलॉग्स

संजय शिरसाट यांनी व्यक्त केला शोक

आमदार संजय शिरसाट यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अअजित पवारांच्या यांच्या मृत्यूंच्या माहितीने एक मोठा धक्का महाराष्ट्राला बसला आहे. हा असा एक नेता होता ज्याची राजकारणामध्ये सर्वांना आदरयुक्त भीती वाटत होती. की समोर दादा आहे. खऱ्या अर्थाने दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. राजकारणामध्ये अनेक संकटे त्यांच्यावर आली पण ते कधी डगमगले नाहीत. ते बेधडकपणे निर्णय घेत होते. कालच त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली. काल कॅबिनेट मिटिंगला सुद्धा ते उपस्थित होते, अशा भावना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Dcm ajit pawar plan crush death mp raut nilesh lanka paid tribute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news
  • ajit pawar plane crash

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
2

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.