Death Of Cow In Warna Canal Accidental Death By Falling Into Canal Revealed In Forest Department Inquiry Nrab
वारणा डावा कालव्यात गव्याचा मृत्यू , कॅनॉल मध्ये पडून अपघाती मृत्यू ; वन विभागाच्या चौकशीत उघड
अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात सुमारे १४ वर्षे वय असणाऱ्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची घटना घडली आहे. हा गवा पाणी पिण्यासाठी कलव्या जवळ गेल्यावर कालव्यात पडला असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शिराळा : अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात सुमारे १४ वर्षे वय असणाऱ्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची घटना घडली आहे. हा गवा पाणी पिण्यासाठी कलव्या जवळ गेल्यावर कालव्यात पडला असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, चांदोली अभयारण्यातून बाहेर आलेला गवा, सकाळी ८ च्या सुमारास
अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात वाहत आला होता, लोकांच्या निदर्शनास आले, भाष्टे मळ्या जवळ काही लोकांना कालव्यात गवा वाहत असलेला दिसला, यावेळी तो जिवंत होता, मात्र अरळा-सोनवडे जवळ हा गवा मृत अवस्थेत कालव्यात दिसला, स्थानिकांनी ही माहिती वन विभागाला कळवली, वन विभागच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कालव्यातील पाण्याला प्रचंड वेग असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले, दरम्यान स्थनिकांच्या मदतीने त्याला दोरीने बांधून ठेवले, त्यानंतर जेसेबी यंत्राच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.
गव्याला निसर्गतः पोहता येत असल्याने त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शंका होती, मात्र शव विच्छेदन अहवाल आणि त्याच्या अंगावर असणाऱ्या खुना मधून तो पाण्यात बुडून मृत झाल्याचे स्पष्ट झाले.
[blockquote content=” शवविच्छेदन करताना त्याच्या खुरांची झालेली झिज, शिंगावरचे मार्क, गुढघ्याला झालेल्या जखमा व चाऱ्याने भरलेलं पोट पाहिले की नक्की खात्री होती की हा घातपात नसून नैसर्गिक मृत्यू आहे, याची खात्री झाली होती, की हा मृत्यू नैसर्गिक असला तरी तो पाण्यात बुडून नाही तर बंदीस्त कॅनॉल च्या वाहत्या पाण्यात बुडून झाला आहे. ” pic=”” name=”- अजितकुमार पाटील , मानद वन्य जीव संरक्षक”]
Web Title: Death of cow in warna canal accidental death by falling into canal revealed in forest department inquiry nrab