Uddhav Thackeray on Election Commission : आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये आज काही सेलिब्रेटींनी देखील मतदान केले, परंतु काही ठिकाणी खूप विलंब झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर काही ठिकाणी मतदारांना 3 ते 4 तास थांबावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याचबरोबर मराठी कलाकार आदेश बांदेकर यांनेसुद्धा यावर संताप व्यक्त केला आहे. आता खुद्द उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, जिथे ठाकरे गटाला मतं पडतात तिथे जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ठाकरे गटाला मते पडतात तिथे जाणीवपूर्व उशीर
कारण नसताना मतदारांना उशीर केला जात आहे. ठाकरे गटाला जिथे मते पडताहेत तिथे जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. कंटाळून परत गेले असतील त्यांना परत मतदान करण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर जेथे मतदारांना उशीर झालाय तेथे मतदार जर परत गेले असतील त्यांनी पुन्हा एकदा मतदान केंद्रावर जावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.
मतदान अधिकाऱ्यांना सोडू नका
यामध्ये जर सकाळ झाली तरी मतदारांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथे थांबणे गरजेचे आहे. परंतु, मतदारांनी कंटाळून न जाता मतदार केंद्रावर जावे आणि मतदान करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मोदी सरकार पराभवाच्या भीतीने पछाडलेले
मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पराभवाच्या भीतीने पछाडलेले मोदी सरकार यामध्ये काही तरी गडबड करण्याच्या नादात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे सर्व मतदारांना पाहायला मिळत आहे.