Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक

पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या आराखड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुगेवाडी येथील पुणे महामेट्रो कार्यालयात पदाधिकारी आणि संचालकांसोबत बैठक घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 21, 2025 | 05:25 PM
वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या आराखड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुगेवाडी येथील पुणे महामेट्रो कार्यालयात पदाधिकारी आणि संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो मार्गाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सादर करून भविष्यातील वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या गेल्या. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान, सकाळी सात वाजता ही बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित मेट्रो मार्ग

सध्या प्रस्तावित मार्गाची सुरुवात भक्ती-शक्ती चौकापासून होऊन पुढील ठिकाणांमधून जातो:

मुकाई चौक – भूमकर चौक – भुजबळ चौक – पिंपळे सौदागर – नाशिक फाटा – वल्लभनगर – टाटा मोटर्स कंपनी – तळवडे एमआयडीसी – चाकण एमआयडीसी – चाकण शहर.

या मार्गाची लांबी जवळपास 41-42 किलोमीटर असेल, ज्यात काही बदल होऊ शकतात.

बैठकतील महत्वाचे मुद्दे

  • मेट्रो मार्गावरील प्रस्तावित स्टेशन आणि मार्गाची माहिती उपमुख्यमंत्री यांनी तपासली
  • पुण्यातील डबल डेक्कर फ्लायओव्हर प्रकल्पाबाबतही चर्चा
  • चाकण आणि हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना
  • पिंपरी ते निगडी मेट्रो लाईनचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज
वाहतूक सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्रांवरील परिणाम

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्क, तळवडे एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मेट्रो मार्ग फायद्याचा ठरेल, असे सांगितले. हिंजवडी आणि चाकणच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत मार्गावरील अंतिम ठराव आणि विस्तारीकरणावर अंतिम निर्णय घेतला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बैठकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मोठा हातभार लागणार आहे, तर औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Deputy chief minister ajit pawar has held a meeting for the pimpri chinchwad to chakan metro extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

‘महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारूंच्या टोळ्याही वाढल्यात’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल
1

‘महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारूंच्या टोळ्याही वाढल्यात’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Model code of conduct violation: राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलावर पैसे वाटपाचा आरोप; पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा
2

Model code of conduct violation: राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलावर पैसे वाटपाचा आरोप; पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार
3

Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
4

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.