Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

आता रिकामं ठेवू नका...काहीतरी जबाबदारी द्या...अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली होती. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2025 | 04:05 PM
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

Follow Us
Follow Us:

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली होती. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या अखेरीस धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यानंतर, आता अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही भूमिका मांडली, धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या जाहीरपणे केलेल्या मागणीतून त्यांना मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची इच्छा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. त्याला या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असं सांगत त्यांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रि‍पदाची आस लागली आहे.

Web Title: Deputy chief minister ajit pawar has hinted at giving new responsibility to dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • dhananjay munde
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.