Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar: विद्यार्थ्यांची पायपीट थांबली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोयना-कांदाटीतील २५० विद्यार्थ्यांना सायकलींची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना–कांदाटी खोऱ्यातील २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ४ ते ५ किमी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 09:26 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोयना-कांदाटीतील २५० विद्यार्थ्यांना सायकलींची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोयना-कांदाटीतील २५० विद्यार्थ्यांना सायकलींची भेट

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांची पायपीट थांबली!
  • एकनाथ शिंदेंकडून कोयना-कांदाटीतील २५० विद्यार्थ्यांना सायकलींची भेट
  • मुलांना मोठा दिलासा
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना–कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा उपक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. या भागातील गरीब व गरजू शेतकरी कुटुंबातील तब्बल २५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दररोज शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोयना–कांदाटी परिसर हा डोंगराळ व काही प्रमाणात दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक गावे अद्यापही शिक्षण, वाहतूक आणि दळणवळणाच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना दिसतात. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब अंतर पायी चालत जावे लागत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होत असल्याची बाब अनेकदा समोर आली होती.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक विद्यार्थ्यांच्या अडचणीची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. नवीन सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी येत असताना अनेक वेळा त्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून पायी जाताना पाहिले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी जवळून अनुभवल्यानंतर त्यांच्यासाठी कायमस्वरूपी स्वरूपाचा उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच २५० विद्यार्थ्यांना २५० सायकली देण्याचा निर्णय प्रत्यक्षात उतरला.

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा वेळ कमी होणार असून अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार आहे. तसेच दररोजचा शारीरिक थकवाही कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली ही मदत केवळ सायकल वाटपापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेली प्रेरणा असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

शिक्षणासाठीची धडपड आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांतून अधिक प्रभावीपणे दिसून येतो. कोयना–कांदाटी खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला असून पुढील अनेक वर्षे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात या सायकली शिक्षणाचा नवा प्रवास घडवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

Web Title: Deputy chief minister eknath shinde gifts bicycles to 250 students from koyna kandati1253241

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahabaleshwar
  • Pachgani

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
1

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
2

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर
3

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले
4

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.