Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशवंतराव चव्हाणांच्या विचार अन् कार्याला संगीतातून उजाळा! कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगम परिसरात त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 06:49 PM
यशवंतराव चव्हाणांच्या विचार अन् कार्याला संगीतातून उजाळा! कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

यशवंतराव चव्हाणांच्या विचार अन् कार्याला संगीतातून उजाळा! कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

Follow Us
Follow Us:

 

  • यशवंतराव चव्हाणांच्या विचार अन् कार्याला संगीतातून उजाळा!
  • कराडच्या प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांसह, मान्यवरांचे जयंतीदिनी अभिवादन
कराड/प्रतिनिधी : – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे विचार राज्याच्या विकासासाठी आजही प्रेरणादायी आहेत. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करण्याचा आमचा निर्धार आहे, अशी भावना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी व्यक्त केली.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगम परिसरात त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण पाया रचणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि कार्य आजही मार्गदर्शक ठरतात. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात चव्हाण साहेबांच्या विकासाभिमुख विचारांना नेहमीच प्रेरणास्थान मानले… pic.twitter.com/CAoewS5Yxk — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) March 12, 2026


समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे; तर देशाचेही दूरदर्शी नेतृत्व होते. त्यांच्या कार्यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरली. त्यांच्या विचारांमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात विकासाची परंपरा निर्माण झाली आहे. त्या विचारांवर चालत राज्याच्या प्रगतीसाठी पुढेही काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा प्रभाव आजही राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात जाणवतो. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राला मजबूत पाया मिळाला असून त्याच मार्गदर्शनातून विकासाची वाटचाल सुरू आहे.

Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

दरम्यान, विधान भवन परिसरात बॉम्ब आढळल्याची चर्चा असल्याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, या संदर्भातील माहिती माध्यमांकडूनच समजली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ती अफवा असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. अधिकृत चौकशी झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक आणि विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘शब्द-सुरांची भावपूर्ण आदरांजली’ या विशेष कार्यक्रमालाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमातून गीत-संगीताच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिरस्त्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही शालेय विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून त्यांचा उत्साह वाढवला.

DCM Sunetra Pawar Live : सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा

Web Title: Deputy cm sunetra pawar pays tribute to yashwantrao chavan karad visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Karad
  • Maharashtra Politcs
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस
2

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
3

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
4

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.