Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टपासूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले. प्रमाणपत्रांच्या तक्रारी दूर करण्यासाठी दोन-तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश देणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 08:44 PM
Manoj jarange Patil with Maharashtra ministers

Manoj jarange Patil with Maharashtra ministers

Follow Us
Follow Us:
  • 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम
  • मराठा प्रमाणपत्रांच्या तक्रारींवर दोन-तीन दिवसांत निर्णय
  • नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
 

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.

या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असतील किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे दाखले रद्द होत असतील, तर त्याची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमाणपत्रांच्या तक्रारींवर सरकारची हालचाल

विखे पाटील म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. काही ठिकाणी पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालण्यात आले आहे.

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप

यासंदर्भात पुढील दोन-तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. प्रमाणपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

बहिणीला प्रमाणपत्र, भावाला नाही; अधिकाऱ्यांना इशारा

मराठा समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र देताना भेदभाव होत असल्याच्या तक्रारींवरही विखे पाटील यांनी भाष्य केले. काही ठिकाणी बहिणीला प्रमाणपत्र मिळते, मात्र भावाला ते नाकारले जाते, अशा तक्रारी समोर आल्याचे त्यांनी मान्य केले.

नियमांनुसार पात्र व्यक्तीला प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. एखादा अधिकारी नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. गरज पडल्यास निलंबनाची कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

‘… तर मराठी शाळा बंद पडल्या नसत्या’; न्यायमूर्ती प्रसन्न वराळेंचे सरकारला खडेबोल

दरम्यान, 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत सरकारने जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. शासनाची भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. आता अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि प्रमाणपत्रांच्या तक्रारी कितपत दूर होतात, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maratha reservation radhakrishna vikhe patil on manoj jarange certificate issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Radhakrushn Vikhe Patil

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
2

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
3

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.