देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट घालूनच बाहेर पडतात. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारातही अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसत आहेत. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी फडणवीसही अर्ज भरण्यासाठी गुलाबी रंगाचं जॅकेट घालून आले होते. त्यामुळे गुलाबी रंग आणि निवडणुकांचा नक्की संबंध काय, याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.
#WATCH | Nagpur | Maharashtra Deputy CM & BJP candidate from Nagpur South-West Assembly seat, Devendra Fadnavis says, “I express my gratitude to PM Modi, Union HM Amit Shah, party’s national president JP Nadda and Union minister Nitin Gadkari for showing trust in me and given me… pic.twitter.com/moi8VKfgsl
— ANI (@ANI) October 25, 2024
देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज नागपूर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून १९९९ पासून एकही निवडणूक हरले नाहीत. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी घातलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची चर्चा होती. त्यामुळे पत्रकारांनीही या रंगाचं जॅकेट घालण्यामागचं कारण विचारलं, त्यावर ते म्हणाले, खरं सांगायचं झालं तर माझ्या मनातला रंग भगवा आहे. पण मी नेहमी सगळेच रंग वापरतो. हा एकच रंग वापरतो असं नाही, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि अजित पवार गटाला मोठं अपयश आलं. त्यानंतर अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेत प्रतिमा सुधारण्यासाठी गुलाबी जॅकेटचा पर्याय निवडल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा–Maharashtra Assembly Election : वरळीत होणार हायव्होल्डेज लढत, आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटाचा उमेदवार ठरला?
मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिली आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा विश्वास आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा-Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला, ५ जवान गंभीर जखमी
राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांच सरर्थन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यावरचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी विदेशात ज्या पद्धतीचे विचार मांडले तशीच मानसिकता पंडीत नेहरुंचीही होती. इंदिरा गांधींचीही होती आणि राजीव गांधींचीही होती, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली.