Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर? नागरिकांचा संताप वाढला

धाराशिव जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 08:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने शासनामार्फत सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका सेवा सध्या धाराशिव जिल्ह्यात गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जनतेसाठी जीवनरक्षक मानली जाणारी ही सेवा आता अनेकांच्या मते अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेली असून, मदतीऐवजी त्रास देणारी यंत्रणा बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील अनेक भागांतून या सेवेविरोधात सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे, अनेकदा फोन करूनही प्रतिसाद न मिळणे, चुकीची माहिती देणे, अनावश्यक विलंब करणे, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, उपचारासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक तणाव सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे, या संदर्भातील अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून, ‘१०८ सेवा खरोखर जनतेसाठी आहे की केवळ कागदोपत्री व्यवस्था?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून या सेवेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात सेवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने या निधीचा वापर नेमका कशासाठी होतो, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. काही नागरिकांनी तर ही सेवा ‘शासकीय निधी खर्च करण्याचे माध्यम’ बनल्याचा आरोपही केला आहे.

Satara News : सातारा पालिकेत शिस्तीचा इशारा; शिवेंद्रसिंहराजेंची पदाधिकाऱ्यांना कानउघाडणी, राजकारण पुन्हा तापले

आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम बनवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच रुग्णांचा या सेवावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णाच्या जीवापेक्षा कोणतीही यंत्रणा मोठी असू शकत नाही. त्यामुळे वेळेशी स्पर्धा असलेल्या आपत्कालीन आरोग्य सेवेत होणारा हलगर्जीपणा किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याची जाणीव प्रशासनाला कधी होणार, हा खरा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Web Title: Dharashiv news is the 108 ambulance service in dharashiv on a ventilator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
1

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
2

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.