Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान

Maharashtra Politics: गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले, पण त्यानंतरही भाजपकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑपरेशन लोटस सुरूच आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 10:40 AM
Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना शिंदे गटातील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात
  • भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात आक्रमक
  • धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः कळंब, भूम आणि परंडा भाग हे राजकीय चित्र अत्यंत रंजक वळणावर
Dharashiv News: राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटातील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात असल्याचे खळबळजनक विधान माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिवमध्ये झालेल्या संकल्प मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

तानाजी सावंत भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे, शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्याची प्लॅनिग करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नक्षलवाद्यांनो खबरदार! छत्तीसगडच्या ‘या’ जिल्ह्यात चकमकीचा थरार; Armed Forces ने 6 जणांना थेट…

धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः कळंब, भूम आणि परंडा भाग हे राजकीय चित्र अत्यंत रंजक वळणावर असल्याचे दिसते. नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही याचे पडसाद उमटत आहेत, हे राजकारणातील बदलत्या समीकरणांचेच द्योतक आहे.

महायुतीमधील अंतर्गत तणाव

कळंबमध्ये भाजप-शिवसेना युती पाहायला मिळाली असली, तरी भूम-परंडा मध्ये भाजपने थेट तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीयांशी हातमिळवणी केल्याचे दिसते. यामुळे महायुतीमध्ये ‘वरिष्ठ पातळीवर एकी आणि स्थानिक पातळीवर बेकी’ असे चित्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वेळी आणि प्रचारात दिसून येईल.

दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले, पण त्यानंतरही भाजपकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑपरेशन लोटस सुरूच आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसचा फटका ठाकरे गटालाच बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना अनेकदा ठाकरे गटातील भाजपात प्रवेश दिला आहे. नगरसपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील आठ ते दहा जणांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच आहे.

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट

धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यांमधील संघर्ष हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलेला हा ‘धक्का’ जिल्ह्याच्या राजकीय गणितात महत्त्वाचा ठरणार आहे.

ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड

सांजा, कनगरा, रामवाडी, गावसुद, बेंबळी, धारूर आणि तामलवाडी यांसारखी गावे राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय मानली जातात. या गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे, हा ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासाठी मोठा संघटनात्मक फटका आहे. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर मतदान खेचून आणण्याची क्षमता ठेवतात, त्यामुळे त्यांचा पक्ष सोडणे शिवसेनेच्या (UBT) स्थानिक नेटवर्कला कमकुवत करू शकते.

Web Title: Dharashiv news tanaji sawants sensational revelation that a faction within eknath shindes shiv sena is preparing to join the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Eknath shinde Shivsena
  • Maharashtra Politics
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग
1

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…
2

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

PMC Election Result 2026:  स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी
3

PMC Election Result 2026: स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.