Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election : उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात, धाराशिव तालुक्यात २५ उमेदवारांची माघार

राज्यातल्या बारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 24, 2026 | 02:29 PM
उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात, धाराशिव तालुक्यात २५ उमेदवारांची माघार

उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात, धाराशिव तालुक्यात २५ उमेदवारांची माघार

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यात नगरपालिका, महानगरपालिकानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी होती. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण ७६९५ अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी असे १३०२३ रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. फक्त १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होत आहेत. या जांगासाठी पाच फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

जिल्हा परिषदेसाठी धाराशिवमध्ये सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेच्या ५५ ​​जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सुमारे ९६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. धाराशिव पाठोपाठ कोल्हापूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी ९०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी ८५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वात कमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ५६ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

याचदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत असून शुक्रवारी २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतून १३ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. तर एका गटातील उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. जिल्यातील पंचायत समिती गणांतून १२ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे.

धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातून ९ उमेदवारांनी, तुळजापूर, भूम, परंडा आणि लोहारा तालुक्यातील प्रत्येकी एका उमेदवाराने आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती गणांतून ३ उमेदवारांनी, तुळजापूर तालुक्यातील २ उमेदवारांनी, लोहारा तालुक्यातील ३ उमेदवारांनी आणि भूम, परंडा, उमरगा, वाशी या तालुक्यातील पंचायत समिती गणांतून प्रत्येकी एकाने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Ganpatipule मंदिरात माघी यात्रेला अलोट गर्दी; भाविकांनी लुटला खरेदीचा आनंद

Web Title: 25 candidates withdraw in dharashiv taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Dharashiv
  • ZP Election
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती
1

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर
2

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

गुंतवणुकीच्या आमिषाने ११.४६ लाखांची सायबर फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा
3

गुंतवणुकीच्या आमिषाने ११.४६ लाखांची सायबर फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल
4

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.