Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Dharashiv News: धाराशिव तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत काँग्रेसने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविमा, शासकीय अनुदान आणि आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 06:31 PM
शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
  • खरीप पिकांचे पंचनामे करून पीकविमा, अनुदान व आर्थिक मदत देण्याची तहसीलदारांकडे मागणी
  • पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात
धाराशिव: धाराशिव तालुक्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. या मागणीसाठी तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी तहसीलदारांना निवेदन दिले.

पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात

काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, जुलै आणि ऑगस्ट या महत्त्वाच्या महिन्यांत तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. दीर्घकाळ पावसाने खंड दिल्याने अनेक भागांतील खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पिके वाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहिल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

५ सुवर्ण,६ रौप्य पदकांची मानकरी…‘महाराष्ट्राची वाघीण’म्हणून ओळख; अश्विनीने तीन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल

तातडीने पंचनामे करण्याची मागणी

पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासोबतच पीक अनुदान आणि आवश्यक आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली.

पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

पावसाच्या खंडाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर पशुधनावरही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठीही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

खरीप पिकांचे नुकसान, पावसातील मोठा खंड, शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.

काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित

निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, विचार विभागाचे अध्यक्ष खलील सय्यद, जावेद काझी, धाराशिव शहराध्यक्ष धनंजय राऊत, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, अंकुश पेठे, संदीप कदम, धोंडीराम करंजकर, सुधीर गव्हाणे, संतोष वडवले, इमाम शेख, डॉ. रमाकांत वाघमारे, विकास ढवळे, दिगंबर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता काँग्रेसच्या या मागणीनंतर प्रशासन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि दुष्काळी परिस्थितीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

Web Title: Congress demands dry drought declaration in dharashiv taluka crop insurance compensation for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
1

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
2

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
3

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.