Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने स्टार्टअपसारखे काम करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने शासन वाटचाल करत असल्याचे सांगितले. प्रशासनाने स्टार्टअपप्रमाणे वेगवान, नवकल्पनात्मक आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2026 | 06:34 PM
देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची ‘स्टार्टअप’शी तुलना करत, प्रत्येक विभागाने स्वतःकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले.

‘BEST’ प्रवाशांसाठी गूड न्यूज! आता तिकीटासाठी नव्या ॲपची गरज नाही; Google Pay, PhonePe द्वारे थेट बुक करा ई-तिकीट

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झिरो ब्युरोक्रसी म्हणजे अधिकारी नसणे नव्हे, तर प्रक्रियांची पुनर्रचना (री-इंजिनिअरिंग) करून त्या अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे होय. कोणत्याही व्यक्तीच्या पसंती-अपसंतीवर सेवा अवलंबून न राहता, पात्रतेनुसार सेवा मिळाली पाहिजे. या शासनाने 100 दिवस आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्यातील 85 टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा आराखडा मांडताना 2029, 2035 आणि 2047 हे तीन टप्पे निश्चित केल्याचे सांगितले. “महाराष्ट्र आता देशांतर्गत नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धा करत आहे. राज्याची अर्थव्यवस्था जगातील 30व्या क्रमांकावर असून, आगामी काळात ती आणखी बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी 20 महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, ‘आपले सरकार 2.0’च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामाकडे ‘स्टार्टअप’च्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नावीन्य, कार्यक्षमता आणि वेग यांचा संगम साधता येईल. अशा उपक्रमांमुळेच प्रशासन ‘झिरो ब्युरोक्रसी’कडे वाटचाल करू शकते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून “प्रशासनातील कल्पकता आणि नव्या कल्पनांची अंमलबजावणी हीच भविष्यातील बदलाची दिशा ठरेल,” असे सांगत त्यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले.

Women Reservation Bill : “संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? संजय राऊतांनी काढले सत्ताधारी नेत्यांचे वाभाडे

Web Title: Zero bureaucracy governance devendra fadnavis startup approach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास, नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास, नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश
2

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार
3

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

Devendra Fadnavis : महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय; महारेलच्या ६५ कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी
4

Devendra Fadnavis : महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय; महारेलच्या ६५ कामांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.