Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 03:31 PM
धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर
  • गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान
  • वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
शीतलकुमार शिंदे । धाराशिव : धाराशिव तालुक्यात मंगळवारी, २१ एप्रिल रोजी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर मुसळधार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला. विशेषतः धारूर परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की, शेतजमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याने जणू बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले ‘बर्लिन’! ज्योतीनगरमध्ये शहरातल्या पहिल्या अत्याधुनिक प्ले पार्कचे लोकार्पण

या वादळामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्ष, लिंबू यांसारख्या फळबागांना तसेच कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. झाडांची फांदी मोडून पडल्याने आणि गारांच्या माऱ्यामुळे फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब व रोहित्र कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. धारूर येथे एका पुलावरून टिप्पर घसरून पुराच्या पाण्यात पडल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विठ्ठलवाडी येथे शेतात काम करत असताना बबन लांडगे या शेतकऱ्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील, तहसीलदार मृणाल जाधव आणि तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाने यांनी बाधित भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Malegaon Blast News : 2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Web Title: Dharashiv unseasonal rain hailstorm crop damage farmer death news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • Unseasonal Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
2

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
3

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
4

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.