Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी

येत्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 09:55 AM
नाशिक जिल्ह्यात १६२ गावांना टँकर

नाशिक जिल्ह्यात १६२ गावांना टँकर

Follow Us
Follow Us:

नाशिक : मार्चच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. मे महिन्यात पारा अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता धरणातील जलसाठ्यावरून दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम धरणांचा मिळून २६ प्रकल्पांमध्ये आता केवळ ४४.३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७ प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये ४४ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

गंगापूर धरण समूहात इतर धरणांच्या तुलनेने बरी स्थिती असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत येथेही पाणीसाठा कमीच आहे. गंगापूर धरणात सध्या ५४.१४ टक्के तर दारणात ५१.२८ टक्के, कडवा धरणात ५२.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या तुलनेत लहान आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मात्र पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

येवला तालुक्यात धावताहेत सर्वाधिक टँकर

येवला तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, या तालुक्यात ३१ गाव वाड्यांना १९ टँकरच्या माध्यमातून ३४ फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले जात आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ३६ गावांना ९ टँकरद्वारे १६ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. तर इगतपुरीत ३९ गाव, वाड्यांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाच्या तडाख्याने विहिरी, हातपंप आटले

उन्हाच्या तडाख्याने विहिरी, हातपंपांनाही पाणी आटले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तहान भागवण्यासाठी टँकरची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यात १६२ गावे आणि ५५ वाड्यांना टँकरने पाणी पुरवलेजात आहे. यात १०२ टँकरच्या फेऱ्या करून ९७ हजार ८४१ नागरिकांची तहान भागविली जात आहे. निफाड, मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र असून या भागात टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे.

पाणी टंचाई होण्याची शक्यता अधिक

काही ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने येत्या काळात पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Water Supply Issue : पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा ; अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित

Web Title: 162 villages in nashik supplied with water via tankers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Nashik News
  • Water Issue
  • Water Tanker

संबंधित बातम्या

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
1

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा
2

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.