Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Nitin Gadkari: मुंबई गोवा महामार्गाचे 90 टक्के काम पुर्ण झाले असल्याचा दावा यंत्रणांकडून केला जात आहे. महामार्गावरील पूलांची आणि बाह्यवळण मार्गांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. याचदरम्यान आता नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 12:54 PM
'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते...',नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते...',नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • ‘आता ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा रेकॉर्ड करणार’
  • नितीन गडकरी संतापले, अधिकाऱ्यांनाही थेट इशारा
  • गडकरींचा ठेकेदार-अधिकाऱ्यांना कडक इशारा
Nitin Gadkari: गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या पूर्वीच्या मुंबई-गोवा महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे. गेली अनेक वर्ष लोकार्पणच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. याच मार्गासंदर्भात आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना होणारा विलंब आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खराब काम करणाऱ्या आणि प्रकल्पांना विनाकारण विलंब लावणाऱ्या ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर येत्या एका वर्षात सर्वाधिक ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा ‘रेकॉर्ड’ करण्याचा आपला निर्धार असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

‘मुंबई-गोवा महामार्गामुळे लाज वाटायची’

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर बोलताना गडकरींनी नाराजी व्यक्त केली असून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्यास झालेल्या प्रचंड विलंबामुळे आपल्याला लाज वाटत होती, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महामार्गाच्या उद्घाटनासाठीही येणार नाही, असे आपण यापूर्वी जाहीर केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. आता मात्र परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय गडकरींनी घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावरून रस्त्याने गोव्याला जाणार असून मुंबई-गोवा महामार्गाची स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये विलंब किंवा निकृष्ट काम करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल. त्याचबरोबर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Nitin Gadkari ji– “I want to set a RECORD for blacklisting the maximum number of contractors and taking action against them in a year.” Officials will also face suspension🔥 pic.twitter.com/DPswjOSik2 — Sunny Raj (@SunnyRajBJP) September 10, 2026

गेल्या १५ हून अधिक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाविषयी आता नितीन गडकरी यांनाही लाज वाटू लागली आहे. याबाबत त्यांनीच कबुली दिली. ते म्हणाले की, ” येणाऱ्या काळात मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते की इतका उशीर झाला आहे.”

एका वर्षात जास्तीत जास्त ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा रेकॉर्ड करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि प्रकल्पांच्या वेळेत पूर्ततेबाबत केंद्र सरकार अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर स्थानिक संस्कृतीचे दर्शन

गडकरींनी गोवा सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांसाठी विशेष सुविधा विकसित करण्याची सूचनाही केली. या सुविधांमध्ये गोव्याची वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला परंपरा यांचे दर्शन घडवता येईल, असे त्यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेल पंपांबरोबरच जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर पर्यायी इंधनांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

महामार्गांवर वृक्षलागवडीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन

महामार्गांच्या बाजूला करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीबाबतही गडकरींनी महत्त्वाची भूमिका मांडली. कोणत्या प्रजातींची झाडे लावावीत, कोणती झाडे जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात, याचा वैज्ञानिक अभ्यास करून वृक्षलागवडीचे नियोजन करावे, असे त्यांनी सुचवले.

गोव्याच्या वाहतूक कोंडीवरही उपाय सुचवले

गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी व्यापक अभ्यासाची आवश्यकता असल्याचेही गडकरींनी सांगितले. बाजारपेठांचे एकत्रीकरण, शहरातील गोदामे बाहेर हलवणे आणि बस डेपोमध्ये सुधारणा करणे यांसारखे उपाय त्यांनी सुचवले. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, हायड्रोजन, फ्लेक्स-फ्युएल आणि अन्य पर्यायी इंधन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यायी इंधनाचा वापर वाढल्यास वाहतूक क्षेत्रातून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असे गडकरींनी नमूद केले.

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

Web Title: Nitin gadkari angry over mumbai goa highway delay contractors blacklist officers suspension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai-Goa highway
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
1

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश
2

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
3

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
4

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.