Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

Electricity Workers: राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. थकीत सानुग्रह अनुदान तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला नकार देण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ‘हरियाणा पॅटर्न’च्या धर्तीवर प्रस्ताव तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 02:49 PM
वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीआधी वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड!
  • थकीत सानुग्रह अनुदान तातडीने देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  • खासगीकरणाला नकार, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : दिवाळीच्या तोंडावर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेले सानुग्रह अनुदान (बोनस) तातडीने जाहीर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनी प्रशासनाला दिले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. (Electricity Workers)

बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक विविध प्रश्नांवर प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

खासगीकरणाला नकार; समांतर वीज वितरणालाही ‘नाही’

राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार नाही, तसेच समांतर वीज वितरणाचा परवाना दिला जाणार नाही, अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे वीज क्षेत्रातील खासगीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’

कंत्राटी कर्मचाऱ्यांना हरियाणा राज्याच्या धर्तीवर स्थायी रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांमध्ये सहाय्यक पदाऐवजी थेट स्थायी रोजगार देण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. सहाय्यकांचा कंत्राटी कालावधी तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

पदोन्नती आरक्षणाचा गुंता महाधिवक्त्यांकडे

राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉ. संजय घोडके यांनी पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न बैठकीत मांडला. ७ मे २०२१ चे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करताना, त्याचा परिणाम म्हणून राज्यातील सुमारे ७० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर हे प्रकरण राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर अभिप्रायासाठी पाठविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.

संपकाळातील कारवाई मागे घेण्याचे निर्देश

संपाच्या काळात कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली प्रशासकीय कारवाई थांबविण्याचे तसेच कपात केलेले वेतन पूर्ववत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे संपकाळातील कारवाईच्या प्रश्नावरही कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या कर्जाचा भार शासन उचलणार

महावितरणवरील थकीत कर्जाचा भार राज्य शासन टप्प्याटप्प्याने उचलणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. वीज कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १० टक्के भागभांडवल आयपीओच्या माध्यमातून आणण्याबाबतही निर्णय झाल्याचे नमूद करण्यात आले.

चंद्रपूरमध्ये नवा औष्णिक संच

चंद्रपूर येथे नवीन औष्णिक वीज निर्मिती संच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्प महानिर्मितीच्याच ताब्यात ठेवण्यात येणार असून, पारेषण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी स्थापित क्षमतेत वाढ करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

दरम्यान, कामाचे तास निश्चित करणे, वेतनश्रेणीतील तफावत दूर करणे तसेच इतर सेवाविषयक प्रश्नांवर ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके, सरचिटणीस संजय मोरे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Web Title: Maharashtra electricity employees pending ex gratia diwali cm orders haryana pattern contract workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Diwali
  • electricity
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
1

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
2

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश
4

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.