"माणगावतर्फे वरेडीमध्ये कर्जत परिवर्तन आघाडी परिवर्तन घडवणार", एकनाथ धुळेंचा विश्वास
कर्जत : कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गट हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे,त्यामुळे कर्जत तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईत माणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व तिन्ही विजयी उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केला.माणगाव वरेडी मधील जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुवर्णा ठाकरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार संदेश हजारे यांच्या प्रचार फेरी मध्ये एकनाथ धुळे बोलत होते.
माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद गटाचे कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुवर्णा ठाकरे आणि माणगाव वरेडी गणाचे उमेदवार संदेश हजारे यांच्या प्रचारार्थ दहिवली ग्रामपंचायत मध्ये प्रचार फेरी काढली.या सर्व प्रचार रॅलीमध्ये कुठेही फटाके न फोडता व घोषणाबाजी न करता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अचानक विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्याने साहसकीय दुखवटा यांचे पालन करीत प्रचार सुरू केला आहे. शांतपणे घरोघरी जाऊन उमेदवार प्रचार करत आहेत.
या प्रचारासाठी परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुवर्णा ठाकरे व संदेश हजारे यांना भरघोस मतांनी विजयी करणे हीच आमच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहेत.दहिवली ग्रामपंचायत मधील बिरडोले,कोदीवले,दहिवली, मालेगाव, हंबरपाडा आणि वंजारपाडा तसेच शेंडेवाडी येथे प्रचाराची फेरी काढण्यात आली.या प्रचार फेरी मध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे,शिवसेना ठाकरे गटाचे कर्जत तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर,माजी सरपंच आरती गोमारे,माजी उप सरपंच रामदास हजारे,माजी उप सरपंच जयवंत हजारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षच कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी यावेळी बोलताना ज्या उमेदवारांना आम्ही उभे केले आहेत ते आमच्या सुवर्णाताई असतील संदेश हजारे असतील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी हा प्रचार आम्हाला करायचा आहे. कारण हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे. दादांच्या जाण्याने दुखवटा म्हणून दोन दिवस आम्हाला थांबावं लागल. तरीसुद्धा दोन दिवस आम्हाला वाढून मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यातून चांगली ऊर्जा मिळत आहे. आणि दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायचे असेल तर या या गणातील तिन्ही उमेदवारांना निवडून देणे हेच खरी श्रद्धांजली दादांना असेल.आमच्या प्रवाहामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक येत असतात या दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज, 18 पकड जातीतील कोणीही असते या सर्वांना घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. दादांच्या विचारांची आम्ही निगडित आहोत आणि त्यांचे विचार सोडून आम्ही वागणार नाहीत. दादांच्या जाण्याने ही निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतली आहे जनतेने आम्हाला समोरून प्रोत्साहन दिलेले आहे असा विश्वास धुळे यांनी व्यक्त केला.






