Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Water Crisis : धाराशिवची पाणीस्थिती चिंताजनक; २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा केवळ २२ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 04:56 PM
धाराशिवची पाणीस्थिती चिंताजनक; २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

धाराशिवची पाणीस्थिती चिंताजनक; २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवची पाणीस्थिती चिंताजनक
  • २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
  • लघु प्रकल्पांची अवस्था गंभीर
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण २२७ जलसाठ्यांमधील पाणीस्थिती चिंताजनक असून २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर केवळ चार प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यात सध्या २ मोठे, १७ मध्यम आणि २०८ लघु असे एकूण २२७ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा ५३.३४१ टीएमसी असून तो मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी केवळ २२ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

मोठ्या प्रकल्पांची स्थिती

धाराशिव जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण १२.२२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये लोअर तेरणा प्रकल्पात ३८.०६ टक्के तर मांजरा प्रकल्पात २०.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या प्रकल्पांतील साठा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मध्यम प्रकल्पांमध्येही कमी साठा

जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण १२.६९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांच्या एकत्रित क्षमतेच्या तुलनेत हा साठा सुमारे २१ टक्के इतका आहे.

लघु प्रकल्पांची अवस्था गंभीर

जिल्ह्यातील २०८ लघु प्रकल्पांमध्ये एकूण २८.४२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून अनेक तलाव आणि बंधारे अत्यल्प क्षमतेवर आहेत. काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र कमी असल्याने पाणीसाठा होत नसल्याचे, तर काही प्रकल्प बांधकामाधीन अथवा दुरुस्तीच्या अवस्थेत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जलसाठ्यांची वर्गवारी

पाटबंधारे विभागाच्या तालुकानिहाय वर्गवारीनुसार –

१०० टक्के भरलेले प्रकल्प : ०
७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा : ०
५१ ते ७५ टक्के साठा : ४
२५ ते ५० टक्के साठा : १६
२५ टक्क्यांपेक्षा कमी साठा : ९०
जोताखालील (अत्यल्प) साठा : १०६
पूर्णपणे कोरडे प्रकल्प : ११
अशा प्रकारे २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे चित्र समोर आले आहे.

तालुकानिहाय चित्र

लघु व साठवण तलावांच्या बाबतीत सर्वाधिक प्रकल्प तुळजापूर तालुक्यात (६७) असून त्यापैकी ३७ प्रकल्प जोताखालील स्थितीत आहेत. उमरगा तालुक्यातील ३२ पैकी २१, धाराशिव तालुक्यातील ४२ पैकी १२, तर भूम तालुक्यातील २० पैकी १३ प्रकल्प जोताखालील श्रेणीत आहेत.

पावसावरच भिस्त

मान्सूनने अद्याप अपेक्षित वेग पकडलेला नसल्याने जिल्ह्यातील बहुतेक जलसाठ्यांवर पाण्याचा ताण कायम आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता आगामी काही आठवड्यांतील पावसावर जिल्ह्याची जलस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाटबंधारे विभागाच्या १७ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ५३.३४१ टीएमसी असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे २२ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ३७ टक्क्यांच्या आसपास होता. त्यामुळे यंदा पाणीस्थिती अधिक तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा असलेले केवळ चारच प्रकल्प आहेत.

चांदणी मध्यम प्रकल्प (परंडा) – सुमारे ७३.५० टक्के
जनापूर मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७०.६८ टक्के
कोरेगाव मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७४.३३ टक्के
दाळिंब मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७२.३० टक्के
या चार प्रकल्पांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित सर्व प्रकल्पांची स्थिती त्यापेक्षा कमी आहे.

मोठ्या प्रकल्पांचीही स्थिती समाधानकारक नाही

जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या लोअर तेरणा प्रकल्पात सुमारे ३८.०६ टक्के, तर मांजरा प्रकल्पात सुमारे २०.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दोन्ही मोठे प्रकल्प ५० टक्क्यांच्या खाली असल्याने सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अनेक प्रकल्प अत्यल्प साठ्यावर
वर्गवारीनुसार जिल्ह्यातील –

४ प्रकल्प : ५० टक्क्यांपेक्षा जास्त
१६ प्रकल्प : २५ ते ५० टक्के
९० प्रकल्प : २५ टक्क्यांपेक्षा कमी
१०६ प्रकल्प : जोत्याखालील (अत्यल्प साठा)
११ प्रकल्प : पूर्णपणे कोरडे
अशी स्थिती आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बंधारे आणि लघु प्रकल्प मान्सूनवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

तुळजापूर, उमरगा आणि धाराशिव तालुक्यांत सर्वाधिक ताण

तालुकानिहाय आकडेवारीनुसार तुळजापूर, उमरगा, धाराशिव, भूम आणि कळंब तालुक्यातील मोठ्या संख्येने लघु प्रकल्प जोत्याखालील किंवा २५ टक्क्यांपेक्षा कमी साठ्याच्या श्रेणीत आहेत. काही प्रकल्पांमध्ये पाणलोट क्षेत्र कमी असल्याने पाणी साचत नसल्याचे, तर काही ठिकाणी दुरुस्ती किंवा बांधकाम सुरू असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आगामी पावसाकडे सर्वांचे लक्ष

जिल्ह्यातील २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने आगामी काही आठवड्यांतील पावसावरच पिण्याचे पाणी, सिंचन आणि पशुधनाच्या पाण्याच्या गरजांचे नियोजन अवलंबून राहणार आहे. जलसाठ्यांची सद्यस्थिती पाहता प्रशासनासह शेतकऱ्यांचेही लक्ष आता मान्सूनच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.

Web Title: Dharashiv water storage crisis 222 of 227 projects have less than 50 percent water stock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Water Crisis
  • Water storage

संबंधित बातम्या

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Water Issue : पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा; जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे आणखी हाल होणार
2

Water Issue : पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा; जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे आणखी हाल होणार

Satara News: पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू! समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट
3

Satara News: पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू! समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट

Navi Mumbai : पाणी वाचवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! नवी मुंबईत पाण्याच्या अपव्ययावर लाख रुपयांपर्यंत दंड
4

Navi Mumbai : पाणी वाचवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! नवी मुंबईत पाण्याच्या अपव्ययावर लाख रुपयांपर्यंत दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.