Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv ZP Schools: धाराशिव विकासासाठी मोठे निर्णय; शाळा एकत्रीकरण, विद्युत शवदाहिनी आणि 35 कोटींचे वृक्षारोपण

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींना सोळाव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार नसल्याचा इशारा दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 03:23 PM
धाराशिव विकासासाठी मोठे निर्णय; शाळा एकत्रीकरण, विद्युत शवदाहिनी आणि 35 कोटींचे वृक्षारोपण

धाराशिव विकासासाठी मोठे निर्णय; शाळा एकत्रीकरण, विद्युत शवदाहिनी आणि 35 कोटींचे वृक्षारोपण

Follow Us
Follow Us:
  • जिप अध्यक्षा अर्चना पाटील यांचा इशारा
  • २४ कोटींच्या विद्युत शवदाहिनी
  • ३५ कोटींचे वृक्षारोपण
  • ८३ गावांत अभ्यासिका उभारणार
 

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार असून हा निर्णय मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केली. त्याचबरोबर गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजन न करणाऱ्या ग्रामपंचायतींना सोळाव्या वित्त आयोगाचा निधी दिला जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक आणि महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती त्यांनी दिली.

स्वच्छतेला प्राधान्य; निधीचा निकष ठरणार सांडपाणी व्यवस्थापन

ग्रामपंचायतींनी गावातील सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी ठोस नियोजन केले तरच सोळाव्या वित्त आयोगाचा निधी वितरित केला जाईल. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी रोखण्याची भूमिका जिल्हा परिषद घेणार असल्याचे अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

प्रत्येक पंचायत समिती गणात विद्युत शवदाहिनी

जिल्ह्यातील वाढत्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारांना चालना देण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती गणात सौरऊर्जेवर चालणारी विद्युत शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. जनसुविधा योजनेतून यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून या उपक्रमाला सर्व सरपंचांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

३५ कोटींच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३५ कोटी रुपयांची तरतूद केली असून पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिला जाणार आहे.

८३ गावांत आधुनिक अभ्यासिका

वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील ८३ गावांमध्ये प्रत्येकी २५ लाख रुपये खर्चून आधुनिक अभ्यासिका उभारल्या जाणार आहेत. या प्रस्तावास मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.

प्रत्येक अभ्यासिकेसाठी

२० लाखांची इमारत,
२ लाखांचे फर्निचर व पुस्तके,
१ लाखाचा वाय-फाय व संगणक संच
उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुस्तक खरेदीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी केली जाणार आहेत.

अंगणवाडीतच मिळणार गरोदर व स्तनदा मातांना जेवण

सध्या दिली जाणारी पोषण आहाराची पाकिटे बंद करून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतच ताजे व पौष्टिक जेवण देण्याची नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक गावात इलेक्ट्रिक घंटागाडी

घरोघरी कचरा संकलन आणि त्याची वाहतूक अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक गावाला इलेक्ट्रिक घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सौरऊर्जेकडे गावांची वाटचाल

जिल्ह्यातील प्रत्येक गाव टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेवर आधारित करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. घरकुल योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सौरऊर्जेचा खर्च अडीच हजार रुपये, तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पाच हजार रुपये इतका राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाईल-टीव्ही बंदीपासून सीसीटीव्हीपर्यंत अनेक उपक्रम

ग्रामपंचायत क्षेत्रात प्लास्टिक बंदी, शाळा व अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण, सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये सीसीटीव्ही, अभ्यासिका, सौरऊर्जा वापर, तसेच दररोज संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा जनजागृती उपक्रम राबविण्याचाही निर्णय असल्याची माहिती त्यांनी दिली.

शाळा दुरुस्तीसाठी २२ कोटी; खर्च कुठे करायचा ते आम्ही ठरवू

जिल्ह्यातील शासकीय शाळांतील जीर्ण वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा परिषद शाळांवरच खर्च केला जाणार असून तो कोणत्या शाळांवर खर्च करायचा, याचा निर्णय जिल्हा परिषदच घेईल, असे अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

या निधीसाठी आपण पाठपुरावा केल्याचा दावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला होता. त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करताना अर्चना पाटील म्हणाल्या की, केंद्रीय विद्यालयाच्या प्रश्नावर काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र मागील काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने प्रयत्न करून प्रस्ताव सादर केला असून तात्पुरत्या जागेचाही प्रश्न मार्गी लावला आहे.

जिप शाळांच्या एकत्रीकरणावर ठाम भूमिका

पत्रकार परिषदेत अर्चना पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय कायम राहणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील. जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी हे धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Dharashiv zp school merger to continue archana patil warns on drainage funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • ZP School

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
1

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.