Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Maratha Reservation Protest: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार आंदोलकांनी आक्रमक आंदोलन केल्याची घटना बुधवारी घडली. तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश करून तेथील खुर्ची कार्यालयाच्या आवारात आणून पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 03:53 PM
‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले
  • उमरगा तहसीलदारांची खुर्ची जाळली
  • चार आंदोलक ताब्यात
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे बुधवारी आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले. उमरगा तहसील कार्यालयात प्रवेश केलेल्या चार आंदोलकांनी तहसीलदारांच्या कार्यालयातील खुर्ची बाहेर आणून तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळी तहसील कार्यालयात घडला प्रकार

बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे काही कार्यकर्ते उमरगा तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी कार्यालयातील शिपाई साफसफाईच्या कामात व्यस्त होते. आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदार बसत असलेली खुर्ची केबिनमधून बाहेर काढून तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंड्याच्या कट्ट्याजवळ आणण्यात आली. या खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आल्याचा आरोप आहे.

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा

चार आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात अण्णासाहेब गोविंदराव पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार (सर्व रा. नाईचाकूर) आणि वैजिनाथ आबा काळे (रा. माडज, ता. उमरगा) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गोविंद येरमे यांनी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यापर्यंत घोषणाबाजी

पोलिसांनी आंदोलकांना वाहनात बसण्यास सांगितले असता त्यांनी त्यास विरोध केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेले. या दरम्यान आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ‘मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे’, ‘देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलक पोलीस ठाण्यात पोहोचले.

कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचाही आरोप

तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश करताना आंदोलकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिपायाला धक्काबुक्की करून बळजबरीने प्रवेश केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. तहसीलदार गोविंद येरमे यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांशी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली.

अफवांवर विश्वास ठेवू नका – तहसीलदार

घटनेनंतर तहसीलदार गोविंद येरमे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खात्री नसलेले मेसेज किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत आणि वस्तुस्थिती समजून घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

Web Title: Maratha reservation protest burn tehsildar chair omerga dharashiv four detained case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
1

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
2

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
3

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा
4

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.