Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक! कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना व्यापक संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यावर विशेष भर देण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 24, 2026 | 01:26 PM
Dharashiv News: धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक! कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

Dharashiv News: धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक! कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या बैठकीत संघटन बळकटीवर जोर
  • नव्या नियुक्त्यांची घोषणा
  • ३५ सेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मोठी संधी
 

Dharashiv News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना व्यापक संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्ष निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले. पाटील यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. तळागाळापर्यंत पोहोचून संघटनात्मक बांधणी मजबूत करणे अत्यावश्यक असून, पक्षातील ३५ विविध सेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा

धाराशिव जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारसरणीशी जोडलेला असून, त्या विचारांना मानणारा वर्ग पुन्हा सक्रिय करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन अॅड. अमोल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. तुषार वाघमारे यांनी मांडले.

बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. भूम तालुकाध्यक्षपदी बालाजी गटकळ, जिल्हा चिटणीसपदी आर्यन शिंदे, युवक विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी गणेश खराडे, कळंब तालुका युवक अध्यक्षपदी भीमा हगारे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी अशोक थोरात यांची निवड करण्यात आली. खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागा. महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांनी कठीण काळात पक्ष टिकवून ठेवण्याचा अनुभव सांगितला, तर युवक नेते पृथ्वीराज आंधळे यांनी युवकांना अधिक संधी देण्याची मागणी केली.

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. शाम घोगरे यांनी कठीण परिस्थितीतही पंचायत समितीत यश मिळवल्याचे सांगितले, तर शहराध्यक्ष आयाज शेख यांनी नागरिकांचा विश्वास कायम राखण्याचे आवाहन करताना पराभव व विजय हे लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. प्रारंभी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत आहे. राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. युवक नेते रणवीर इंगळे यांनी प्रथम पक्ष आणि नंतर महाविकास आघाडी अशी भूमिका असावी, असे मत मांडले.

Web Title: Ncp review meeting in dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

Dharashiv News: आरोग्य विभागातील गैरप्रकारांवर विधानसभेत खळबळ; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नावर सरकारची कारवाईची ग्वाही
1

Dharashiv News: आरोग्य विभागातील गैरप्रकारांवर विधानसभेत खळबळ; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नावर सरकारची कारवाईची ग्वाही

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा
2

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याचा गोडवा विरघळला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
3

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याचा गोडवा विरघळला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?
4

धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.