Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Driver: एसटी चालक, वाहकांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु, विभाग नियंत्रकाचे सक्तीचे आदेश

अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी होणार.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 19, 2026 | 04:40 PM
एसटी चालक, वाहकांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु, विभाग नियंत्रकाचे सक्तीचे आदेश

एसटी चालक, वाहकांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु, विभाग नियंत्रकाचे सक्तीचे आदेश

Follow Us
Follow Us:

धाराशिव : राज्य परिवहन महामंडळात कार्यरत वाहक आणि चालक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी करण्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी धाराशिव विभागात सुरू आहे. याची प्रत्येक आगारामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिले आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून राज्यातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी लाखोंच्या संख्येने दररोज प्रवास करतात. सुरक्षित आणि सुखरुप प्रवास हे एसटीचे ब्रीद असून याप्रमाणेच प्रवाशांना सेवा दिली जाते. ही सेवा एसटी अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातील काही चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जात असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आले आहे.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व आगारांमध्ये चालक आणि वाहक यांची ड्युटीवर जाण्यापूर्वी म्हणजेच आगारात आल्याबरोबर अल्कोहोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील विभाग नियंत्रक अनिल पाटील यांनी सर्व आगार प्रमुखांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित करून अल्कोहोल तपासणी करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पथकाची नेमणूक करून तपासणी सुरू केले आहे. यावेळी तपासणी करणारे वाहतूक निरीक्षक याहिया काझी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोमटवार व इतर पर्यवक्षीय कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

एसटीत मद्यपानास ‘शून्य सहनशीलता’ चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

याआधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२५ जानेवारी रोजी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या सदर चौकशी अहवालात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Pune Rain Alert: सणाच्या दिवशी पण पाऊस! पुणे शहरात वरूणराजाने लावली हजेरी

Web Title: St driver testing of carriers alcohol started compulsory orders from divisional controller

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
1

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
2

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी
3

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा
4

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.