Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तिघा भावांनी भर चौकात मोठा चाकू फिरवत गोंधळ घातला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जवाहर कॉलनीतील महिपत पाटील मामा चौकात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 12:06 PM
पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तिघा भावांनी भर चौकात मोठा चाकू फिरवत गोंधळ घातला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनीतील महिपत पाटील मामा चौकात ही घटना घडली आहे. अजय जितेंद्र कांडे, विर उर्फ लिंबराज जितेंद्र कांडे आणि जय जितेंद्र कांडे (सर्व रा. बालाजीनगर) अशी चाकू घेवून फिरणाऱ्यांची नावे आहेत. आरोपींपैकी अजय व लिंबराज कांडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात यापूर्वी खूनाचा प्रयत्न, गाड्या जाळणे तसेच मारामारीचे पाच ते सहा गुन्हा दाखल असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.

 

चाकू फिरवून दहशत पसरविण्याचा डाव

आरोपींनी ज्या ठीकाणी गोंधळ घातला त्याच ठीकाणी त्यांची गुरुवारी दिनांक २५ रोजी पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात रुपेश शंकरराव पेरकर (३२, रा. अरिहंतनगर, जवाहरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे पवन गळी यांच्याकडे सुमारे वर्षभरापासून कामाला आहेत. ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामानिमित्त महिपत पाटील मामा चौकात उभे होते. त्यावेळी अजय कांडे, वीर उर्फ लिंबराज कांडे आणि जय कांडे हे तिघे भाऊ तेथे आले. यातील अजय कांडे याच्या हातात मोठा धारदार चाकू होता. चाकू हवेत फिरवत त्याने परिसरात दहशत निर्माण केली.

हे सुद्धा वाचा : दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी काढली धिंड

पवनच्या सासऱ्याने आमच्या विरोधात तक्रार कशी दिली, त्याला पाहून घेतो. पवन कुठे आहे, त्याला लगेच बोलावून घे, असे म्हणत आरोपींनी रुपेश पेरकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पवन गवळीला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या हातातील चाकू आणि सुरू असलेली आरडाओरड पाहून परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. या प्रकारामुळे काही काळ चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिक जमा होताच आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार वानखेडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

Web Title: The police have arrested the accused who were creating a reign of terror in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
2

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
3

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
4

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.