
Tuljapur Murder Case: रात्रीच्या अंधारात घरात घुसून तरुणाला बळजबरीने नेलं पळवून; तुळजापूरमधील त्या सामूहिक हल्ल्यामागील गूढ रहस्य!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अमीर पटेल याचे तुळजापूर शहरातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचं बोलले जात आहे. यापूर्वी हा वाद मिटवण्यात आला होता, मात्र याच जुन्या गोष्टीचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी कट रचून अमीरवर हल्ला केला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी आधी घरातील सदस्यांना ओलीस ठेवून अमीर पटेलला जबरदस्तीने घरातून उचलून नेले. यानंतर त्याला निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे अमीरचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात गंभीर दुखापत झालेला त्याचा साथीदार अरबाज सय्यद याने हा सर्व घटनाक्रम समोर आणला आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे प्रेम प्रकरणाचा वाद असून, या गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून एकूण १७ आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, ही घटना ‘लव्ह जिहाद’च्या पार्श्वभूमीवरून घडल्याची चर्चा सध्या तुळजापुरात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. घटनेचे गांभीर्य आणि शहरात निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. गुन्ह्यांची नोंद करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, पोलीस या प्रकरणातील प्रत्येक बाजू अत्यंत सूक्ष्मपणे तपासून पुढील कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत. मात्र, प्रकरणाची संवेदनशीलता पाहता पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत विस्तृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Ans: तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या वादातून १८ वर्षीय अमीर पटेल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून त्याचा साथीदार अरबाज सय्यद गंभीर जखमी झाला आहे.
Ans: मृत अमीर पटेलचे एका मुलीशी असलेल्या प्रेम प्रकरणातून हा वाद टोकाला गेला होता, ज्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: या घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून तब्बल १७ जणांचा सहभाग असल्याची माहिती असून, परिसरात 'लव्ह जिहाद'ची चर्चाही रंगली आहे.