Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील अनेक भागांत पावसाचा खंड आणि अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करत माजी आमदार धीरज देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेजची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 09:53 PM
Dhiraj desmukh letter to fadnavis

Dhiraj desmukh letter to fadnavis

Follow Us
Follow Us:
  • पावसाचा खंड, अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात, धीरज देशमुखांचा दावा
  • पीक नुकसानीचे पंचनामे करून DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसानभरपाई देण्याची मागणी
  • कर्जवसुली स्थगित करण्यासह पशुधनासाठी चारा छावण्या आणि चारा बँक सुरू करण्याचे आवाहन
 

राज्यातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोरील परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. पावसात मोठे खंड पडणे, भूजल पातळी खालावणे आणि जमिनीत पुरेसा ओलावा न राहणे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, काही भागांमध्ये उभी पिकेही अडचणीत आल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. परिस्थिती गंभीर असलेल्या भागात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना ती थेट त्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करावी, असेही त्यांनी सुचवले आहे.

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

कर्जवसुली थांबवा, पशुधनासाठी चारा द्या

संकटाच्या काळात शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढू नये यासाठी शेती कर्जांचे पुनर्गठन करावे, व्याजमाफीचा निर्णय घ्यावा आणि सक्तीची कर्जवसुली तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या भागात चारा छावण्या आणि चारा बँका तातडीने सुरू कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती मदत न देता पीक संरक्षण, आर्थिक सहाय्य आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समन्वय साधून सरकारने बळीराजाला आधार द्यावा, असे धीरज देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Dheeraj deshmukh special drought package farmers maharashtra al nino

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • CM Devendra Fadnavis
  • Dhiraj Deshmukh

संबंधित बातम्या

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
1

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 
2

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
3

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
4

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.