Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhom Dam Area : धोम धरण क्षेत्रात दगडी पूल आणि कंटेनर रूम,अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त पाटबंधारे विभागाच्या मौनावर प्रश्नचिन्ह

Dhom Dam Area : वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जलाशयालगत कथित अनधिकृत बांधकाम, दगडी पूल आणि कंटेनर रूम उभारण्यात आल्याचा मुद्दा समोर आला आहे. या बांधकामासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, संबंधित जागा कोणाच्या ताब्यात आहे आणि प्रशासनाला याची माहिती असूनही कारवाई का झाली नाही, असे सवाल उपस्थित होत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 03, 2026 | 05:49 PM
धोम धरण क्षेत्रात दगडी पूल आणि कंटेनर रूम, अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त पाटबंधारे विभागाच्या मौनावर प्रश्नचिन्ह

धोम धरण क्षेत्रात दगडी पूल आणि कंटेनर रूम, अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त पाटबंधारे विभागाच्या मौनावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • कंटेनर रूम उभारण्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली 
  • अतिक्रमणाची पाहणी करून पंचनामा करावा  
  • संबंधितांवर कठोर कारवाई करावी  
 

Dhom Dam Area :  वाई-वाई तालुक्यातील पश्चिम भागातील धोम धरणाच्या जलाशयालगतच्या हद्दीत कथितरित्या अनधिकृत बांधकाम करून दगडी पूल उभारण्यात आले आहे. तसेच धरण क्षेत्रातील जागेचा वापर करून कंटेनर रूम उभारण्यात आल्याची बाब समोर येत आहे. धरणाच्या संरक्षित क्षेत्रात अशा प्रकारचे काम कसे झाले. असे असल्यास त्याला नेमकी परवानगी कोणी दिली? या संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास हे काम आले नाही का? आणि आले असेल तर अद्याप कारवाई का झाली नाही?

असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांनी धरण क्षेत्रातील गाळपेर केली तरी पाटबंधारे विभागाचे नियम, नोटिसा आणि कारवाईचा बडगा; मग दुसरीकडे धरणाच्या हद्दीतच मोठ्या प्रमाणात बांधकाम उभे राहत असताना प्रशासनाचे हात का आखडले? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कंटेनर रूम उभारण्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली

धरण क्षेत्रातील जमिनीचा वापर, जलाशयालगतचे बांधकाम आणि अतिक्रमण याबाबत नियम अस्तित्वात असताना त्यांची पायमल्ली होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर मानावी लागेल. सामान्य शेतकऱ्यांसाठी नियम कडक आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी नियम शिथिल, अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर पाटबंधारे विभागाने देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी दगडी पूल उभारून त्याचा वापर कशासाठी केला जात आहे. कंटेनर रूम उभारण्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली आहे. संबंधित जागा कोणाच्या मालकीची आहे. अथवा ती जागा कोणाच्या ताब्यात आहे.या कामासाठी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग अथवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेची परवानगी घेण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Action Taken Against : कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल

अतिक्रमणाची पाहणी करून पंचनामा करावा

धोम धरणाच्या हद्दीत नियमबाह्य काम झाले असल्यास त्याकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे. केवळ बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; तर हे काम कोणाच्या परवानगीने, कोणाच्या देखरेखीखाली किंवा कोणाच्या दुर्लक्षामुळे झाले, याचा तपास होणे तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे धोम धरण क्षेत्रातील कथित अतिक्रमणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा.

संबंधितांवर कठोर कारवाई करावी

बांधकामाची परवानगी तपासण्यात यावी आणि नियमबाह्य असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.धोम धरणाच्या पाण्यावर आणि परिसरावर सर्वसामान्यांचा अधिकार असताना धरण क्षेत्रात अशा प्रकारे अतिक्रमणाला मोकळीक मिळत असेल, तर पाटबंधारे विभाग नेमका कोणाची वाट पाहत आहे? हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे.

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

Web Title: Dhom dam area alleged encroachment illegal construction container room stone bridge sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai Municipal School: वाई पालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील कारभारावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराच्या कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
1

Wai Municipal School: वाई पालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील कारभारावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराच्या कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
2

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश
3

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट
4

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.