धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसांपूर्वी शरीरापासून मुंडके वेगळे करून धक्कादायक पद्धतीने वृद्धाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या खुनाचा छडा लावल्यानंतर जी माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली ती डोकं चक्रवणारी आहे. मृतकवंशा पांडु सोनवणे (वय 60) याला चोरी करण्याचा आजार होता. यामुळे बैल चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
[read_also content=”सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमितवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/sanglis-romit-chavhan-martyr-in-jammu-kashmir-shopian-see-last-rites-nrps-242431.html”]
आपण दे धक्का या चित्रपटामध्ये चोरी करण्याचा आजार असल्याने संबंधित व्यक्ती काय काय चोरी करू शकतो हे बघितल आहे. तसाच काहीसा आजार साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील वंशा पांडु सोनवणे, या वयोवृद्धास जडलेला होता, परंतु या आजारामुळे या वृद्धास आपला जीव गमवावा लागला आहे. या आजाराच्या धुंदीमध्ये हा व्यक्ती परिसरातील घराबाहेर असलेल्या ज्या ही वस्तू त्याच्या मनास आवडतील त्या चोरी करत असे. आणि ज्या दिवशी त्याचा खून झाला त्या दिवशी देखील तो एका शेतामध्ये जात होता आणि त्याठिकाणी मारेकर्याने काही दिवसांपूर्वीच एक बैलजोडी विकत घेतलेली होती, ही बैलजोडी चोरी करण्यास वंशा सोनवणे हा आला असावा या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला, आणि हा वाद वाढल्यानंतर आपल्या हातात असलेली धारदार कुर्हाडीचे सपासप वार करण्यास विनायक कुवर यांने सुरुवात केली. आणि काही क्षणातच वंशा सोनवणे याचं शिर धडापासून वेगळ झालं. विनायक कुवर याने वंशा सोनवणे याचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला मृतदेह शेजारी असलेल्या शेतात फरफटत नेऊन टाकून दिला व त्या ठिकाणाहून पळ काढला.ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी देखील वंशा सोनवणे हा आपली बैलजोडी चोरी करण्यास आल्याचा संशयातून झालेल्या वादानंतर हा खून केल्याची कबुली मारेकरी विनायक कुवर यांने दिली आहे.
[read_also content=”आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात पुन्हा पडझड, सेन्सेक्स सुरू होताच 281 अंकांनी घसरला, रशिया-युक्रेनमधील तणावाचा फटका https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/sensex-plunges-281-points-in-early-trade-russia-ukraine-tensions-hit-242438.html”]