Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवली उपविभागात ३ महिन्यांत १९९ कुणबी दाखल्यांचे वाटप, साडेसहा लाख नोंदीची तपासणी

कणकवली विभागातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 22, 2024 | 11:11 AM
कणकवली उपविभागात ३ महिन्यांत १९९ कुणबी दाखल्यांचे वाटप, साडेसहा लाख नोंदीची तपासणी
Follow Us
Close
Follow Us:

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील नोंदी शोधण्याची मोहिम सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या अंतर्गत कणकवली विभागातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी या जातींच्या 22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 199 कुणबी दाखल्यांचे वाटप केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

तालुक्यामध्ये दाखल्याच्या नोंदी

कणकवली उपविभागातील वैभववाडी तालुक्यात 2 लाख 40 हजार 414, देवगड तालुक्यात 49 हजार 296 तर कणकवली तालुक्यात 3 लाख 64 हजार 450 अशा एकूण 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली. या नोंदींच्या तपासणीअंती कुणबी मराठा- 897, मराठा कुणबी-484 तर कुणबी जातीच्या 21 हजार 491 अशा एकुण 22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या असल्याचे श्री.कातकर यांनी सांगितले.

सन 1986 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत कणकवली – 795, देवगड-3065 तर वैभववाडी तालुक्यात 1 हजार 724 अशा एकूण 5 हजार 566 कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले होते. ऑक्टोबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत सुमारे 199 कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याचेही श्री.कातकर यांनी सांगितले.

शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या गावांमध्ये या नोंदीची माहिती तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली असून ज्यांना त्या अनुषंगाने जात दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे.

Web Title: Distribution of 199 kunbi documents in 3 months in kankavali sub division inspection of six and a half lakh records maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • kankavali
  • Kunbi
  • Maharashtra Government
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
1

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

Devendra Fadnavis: “ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
3

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला केल्या जाताहेत बाद; 65 वर्षांवरील तब्बल ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ
4

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला केल्या जाताहेत बाद; 65 वर्षांवरील तब्बल ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.