Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का

जिल्हा नियोजन समिती निधी अर्थात डीसीपी हा बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांचा हिरमोड झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2026 | 06:10 PM
District Planning Committee DPC funds stop by cm devendra fadnavis nanded news

District Planning Committee DPC funds stop by cm devendra fadnavis nanded news

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्री फडणवीसांकडून डीपीसी निधी रद्द
  • देवेंद्र फडणविसांच्या निर्णयामुळे विधान परिषदेतील आमदार आणि राज्यसभा खासदारांच्या निधीवर परिणाम
  • नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांकडे विनंती
Political News : नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे आणि आमदार हेमंत पाटील यांना देण्यात येणारा विकास निधी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित विभागाला तसे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात (Nanded Politics) खळबळ उडाली असून, हा निर्णय संबंधित तिघांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा अथवा विधानसभा मतदारसंघातून थेट जनतेतून निवडून आलेल्या आमदार व खासदारांना कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला जातो. या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक भवन, दुरुस्ती कामे आदी विकासकामे राबविण्यात येतात. नांदेड जिल्ह्यातील किनवटचे आमदार भीमराव केराम, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर, नायगावचे आमदार राजेश पवार, हदगावचे आमदार बाबुराव कोहलीकर, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण तसेच लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नियमितपणे असा कोट्यवधींचा विकास निधी उपलब्ध होत आहे.

हे देखील वाचा : आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर

आमदार व खासदारांनी आपल्या मतदारसंघातील कोणती कामे करायची, कोणत्या संस्थांना किंवा ठेकेदारांना कामे द्यायची, याचे विवरण जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर त्यानुसार आदेश काढले जातात. या विकास निधीमुळे कार्यकर्त्यांना कामे मिळतात, त्यातून रोजगार निर्माण होतो आणि राजकीयदृष्ट्या देखील नेतृत्व मजबूत राहते. मात्र खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे आणि आमदार हेमंत पाटील हे सध्या जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने, त्यांच्या नावावरील विकास निधी रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे या तिघांना आता विकास निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.

हे देखील वाचा : बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल

फेरविचार करण्याची मागणी

या नेत्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. आम्ही आधीच काही कामांची पत्रे कार्यकर्त्यांना दिली आहेत. आता त्या कामाचे काय करायचे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचे समजते, मात्र मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने कोणतीही माघार घेण्यात आलेली नाही.

विकासकामांवर परिणाम नाही
२५.१५ या प्रमाणानुसार तसेच ०.४ आणि ०.३ या तरतुदीअंतर्गतचा निधी, दलीत वस्ती, अल्पसंख्याक विकास निधी थेट निवडून आलेल्या आमदारानाच देण्यात येणार आहे, या निधीत कोणतीही कपात झालेली नाही, याशिवाय, काही विकासकामांची बिले प्रलंबित होती, ती प्रशासकीय प्रक्रियेमुळे रखडली होती. मात्र आमचा आमदार निधी कायम असून विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही,असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: District planning committee dpc funds stop by cm devendra fadnavis nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • devendra fadnavis
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray News: ‘मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून’; उद्धव ठाकरेंनी डिवचलं
1

Uddhav Thackeray News: ‘मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून’; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा
2

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची
4

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.