भाजप बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी दहिसरमध्ये रोड शो करत महायुतीचा प्रचार केला (फोटो - एक्स)
मुंबईमध्ये मराठी माणसांच्या मुद्द्यावरुन निवडणूक लढवली जात आहे. याच मुद्द्यावरुन ठाकरे बंधू यांची युती देखील झाली आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. यामध्ये आता भाजपच्या आमदार असलेल्या आणि बिहारच्या आमदार असलेल्या मैथिली ठाकूर या प्रचारासाठी आल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा : “जोपर्यंत तुमचे राजकीय नेते नाही तोपर्यंत बुलडोझर चालणार..! औवेसींचा मुस्लीम समाजाला कानमंत्र
सर्वात लहान वयाच्या आमदार असलेल्या मैथिली ठाकूर यांनी मुंबईतील दहिसर वॉर्ड क्रमांक १ मध्ये रोड शो केला आहे. या रोड शो दरम्यान, त्यांनी मराठीत गाणे गायले आहे. या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आणि कौतुक होताना दिसत आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे… हे मराठी गीत मैथिली ठाकुर यांनी मुंबईमध्ये प्रचारादरम्यान गायले आहे. तसेच या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे आवाहन केले. त्यांनी आम्हाला युपी, बिहार आणि मराठी वेगळे आहेत तसे वेगळे करायचे नाही. आम्हाला विकासासाठी एकत्र काम करायचे आहे असे देखील आमदार मैथिली ठाकूर म्हणाल्या आहेत.
मुंबई महानगर पालिका चुनाव २०२६ के प्रचार के लिए वार्ड क्रमांक 1 दहिसर गणपत पाटिल नगर महायूती शिवसेना की उम्मीदवार श्रीमती रेखा राम यादव जी के समर्थन में भव्य चुनाव प्रचार में भाग लिया 🙏 @BJP4India @BJP4Maharashtra @PMOIndia @CMOMaharashtra @TawdeVinod pic.twitter.com/ATLF6E9d3j — Maithili Thakur (@maithilithakur) January 11, 2026
हे देखील वाचा : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा
भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या मैथिली ठाकूर यांनी रोड शो केला. यावेळी मुंबईच्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच मेथिली ठाकूर म्हणाल्या की, प्रचारादरम्यान मैथिली ठाकूर म्हणाल्या की, आपल्याला लोकांना एकत्र करून विकासाच्या मार्गावर वाटचाल करावी लागेल आणि आपल्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जावे लागेल. हाच संदेश मी घेऊन आली आहे. मराठीच्या मुद्द्यावर मैथिली ठाकूर म्हणाल्या की अरे भाऊ तुम्ही असं काय बोलतात. मी पण उत्तर भारतीय मराठी आहे, असे म्हणत मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न आमदार मैथिली ठाकूर यांनी केला आहे.






