Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: जनगणनेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; पीसीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचा थेट इशारा

Pimpri Chinchwad Census 2027 : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत घरयादी आणि घरगणनेच्या मोहिमेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 05:19 PM
PCMC News, Pimpri Chinchwad, Census 2027, Vijay Suryavanshi,

PCMC News, Pimpri Chinchwad, Census 2027, Vijay Suryavanshi,

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना २०२७ ची पूर्वतयारी सुरू
  • भविष्यातील नागरी सुविधांसाठी जनगणना महत्त्वपूर्ण
  •   जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत घरयादी आणि घरगणनेच्या मोहिमेला सुरुवात
PCMC News: जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालबद्ध प्रक्रिया असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजात दक्षता राखत जनगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Pune Floods: पहिल्याच पावसात पुणे तुंबले; हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला? प्रमोद भानगिरेंचा थेट सवाल

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जनगणना ही केवळ शासकीय औपचारिकता नसून भविष्यातील विकास आराखडे, नागरी सुविधा आणि विविध धोरणांच्या नियोजनासाठी आधारभूत माहिती उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक नोंद अचूक आणि विश्वासार्ह राहणे आवश्यक असून माहिती संकलन करताना विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखण्यावर भर देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जनगणना प्रक्रियेत सहभागी प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी नियमांचे काटेकोर पालन करत नागरिकांशी प्रभावी संवाद साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी क्षेत्रीय पातळीवर समन्वय वाढवून जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अचूक माहिती संकलन आणि वेळेचे नियोजन हीच यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक

पिंपरी चिंचवडमध्ये शहरात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत घरयादी आणि घरगणनेच्या मोहिमेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. ही मोहीम १४ जूनपर्यंत राबविण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेकडून तब्बल ६ हजार ७०२ पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने या मोहिमेसाठी महापालिका आणि खासगी शाळांतील शिक्षकांसह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महापालिका शाळा आणि आयटीआयमधील एकूण ५ हजार ५०२ शिक्षकांचा समावेश आहे, तर महापालिकेच्या विविध विभागांतील सुमारे १ हजार ४०० कर्मचारीही या कामात सहभागी झाले आहेत. प्रत्येक प्रगणकाकडे सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात आली असून, एका पर्यवेक्षकाकडे तीन प्रगणकांचे नियंत्रण असणार आहे.

 

 

Web Title: Dr vijay suryavanshi pcmc pimpri chinchwad municipal corporation census review meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
1

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा; केंद्र सरकारकडे केला महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा; केंद्र सरकारकडे केला महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.