Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार? ‘या’ बड्या मंत्र्याचं सूचक विधान

संतोष देशमुख यांच्या हत्येत कराड यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 28, 2024 | 03:42 PM
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार? 'या' बड्या मंत्र्याचं सूचक विधान

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार? 'या' बड्या मंत्र्याचं सूचक विधान

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वातावरण तापलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी झडताना दिसत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला असून, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सुत्रधार अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येत कराड यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे.

धनंजय मुंडेंची राजीनाम्याबद्दल त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. महाजनांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, असा अंदाज लावला जातोय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंबाबत महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

हे सुद्धा वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराड आहे तरी कोण? धनंजय मुंडेंशी कसे आहेत संबंध? : वाचा सविस्तर

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा देशभरात गाजताना दिसत आहेत.

वाल्मिक कराड कोण आहे?

धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड जिल्हा चालवायचा. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना दरारा होता. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे. आता केज पोलीस ठाण्यात कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Due to the beed case there is a discussion that dhananjay munde will get dachhu from the cabinet nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Sangli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण
1

Sangli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण

Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही….; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा
2

Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही….; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा
3

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.