मुंबई : आज डॉ. बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan din) चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. ‘बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं’ असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.यावेळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मंगल प्रभात लोढा, दिपक केसरकर व संजय राठोड तसेच प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, लोकप्रतिनिधी, भन्ते राहुल बोधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
[read_also content=”कोलंबियात भूस्खलन; आठ मुलांसह ३४ ठार, बस चिखलाखाली दबली https://www.navarashtra.com/world/landslides-in-colombia-34-killed-including-eight-children-bus-buried-under-mud-nrgm-351358.html”]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब, उपेक्षित व वंचित देशबांधवांमध्ये स्वाभिमान जागविला. त्यांचे समता – समानतेचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान बाळगत आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी झालेल्या सभेत सांगितले. अनेक देशातील राजदूत आपणांस ज्यावेळी भेटतात त्यावेळी ते भारत लवकरच जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईल असा विश्वास व्यक्त करतात, असे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रांमध्ये अद्भुत असे योगदान दिले आहे, परंतु जनसामान्यांना आत्मभान देणे हे त्यांचे सर्वात मोठे कार्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे. बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं असं सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले, डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलोय आणि चालत राहू असं राज्यपालांनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय.
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे. बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.