भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप भाजपने केलाय. लातुरातील मजगे नगर भागात निवडणूक प्रचारानिमित्त जात असताना हा प्रकार घडला, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली. याप्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.दरम्यान, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करून याप्रकरणी पोलिसांत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिलीय.