पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनाला विरोध (फोटो -टीम नवराष्ट्र)
पंढरपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसेच परराज्यातूनही लाखो भाविक दर्शना साठी येतात. परंतु त्या भाविकांना कित्येक तास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन करावे लागते. परंतु आमदार,मंत्री, अध्यक्ष तसेच मंदिर समितीच्या सदस्यांचे पाहुणे मित्र यांना मात्र दर्शन रांगेत न थांबता व्हीआयपी चरण दर्शन दिले जाते. मग सर्वसामान्य भाविकांना का व्हीआयपी दर्शन मिळत नाही. त्यांनाच का तासंतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते? की फक्त गरीब भाविकांनीच रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचं का असा सवाल ही उपस्थित होत आहे.
पंढरपूरला प्रतिक्षा वारकऱ्यांची अन् पालखीची
राज्यामध्ये आषाढी वारी सुरु झाली आहे. विविध संत महात्माच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. संताच्या सर्व पालखी मार्गांवरील भाविकांना देणारे येणारे सुविधांची कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील टीम ग्राऊंडवर पाहणीसाठी आले आहेत. या टीमने पालखी मार्गावर अंतिम टप्प्यात असलेले कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
पंढरपूरला प्रतिक्षा वारकऱ्यांची अन् पालखीची; सुविधांची पाहणीसाठी पालकमंत्र्यांची टीम ग्राऊंडवर…!
जर्मन हॅंगर निवास व्सवस्थेची ची कामे अंतिम टप्प्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर भंडी शेगाव येथील पालखीतळावर जर्मन हँगर चे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी 5000 पेक्षा अधिक भाविकांची निवासाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी मोबाईल चार्जिंग च्या सुविधा सह महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय तसेच हिरकणी कक्षाची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे .
१० पालखी मार्गाच्या नियोजनासाठी 21 पालक अधिकारी – सीईओ जंगम
सोलापूर जिल्ह्यात विविध मार्गावरील दहा प्रमुख पालखी मार्गावरील संताचे पालखी सोहळे व भाविक येतात. या पालखी मार्गावर भाविकांना देणेत येणारे सुविधांसाठी २१ जिल्हा स्तरावरील अधिकारी, विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. निवास व्यवस्था, हिरकणी कक्ष, स्नानगृह , पिण्याचे पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा याबरोबरच मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. दररोज या नोडल अधिकारी यांचा आढावा घेण्यात येतो, असेही सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.