Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जावून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 06, 2026 | 07:20 PM
DyCM Sunetra Pawar, Baramati area damaged by Heavy rain, Heavy rain, Maharashtra, Monsoon news,

DyCM Sunetra Pawar, Baramati area damaged by Heavy rain, Heavy rain, Maharashtra, Monsoon news,

Follow Us
Follow Us:

बारामती, प्रतिनिधी: तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जावून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्यशासनाच्यावतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असेही पवार म्हणाल्या.

यावेळी उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या, बधितांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून त्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने काम केले जात आहे. राज्य शासन संकटाच्या काळात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते. त्यामुळे धीर धरा, खचून जावू नका, असे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मौजे माळवाडी (लोणी) येथे २ जून रोजी झालेल्या वादळात पत्र्याच्या शेड पडून मयत झालेल्या नंदाबाई जनार्धन लडकत यांच्या कुटुंबियांचे भेटून सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंबियांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून ४ लाख रुपये व २ शेळयांना ८ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रल्हाद पांडुरंग लडकत यांना १६ हजार रुपये, बाळासाहेब अमृता लडकत यांना ८ हजार रुपये आणि नंदा प्रताप फरांदे यांना १२ हजार रुपयांचा नुकसान भरपाईबाबतचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा

मौजे गुणवडी येथील राधा रवीन आगवणे यांचे घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत, मौजे काऱ्हाटी येथे नारायण लोणकर यांच्या शेतात सुमारे संख्या २५० ते ३०० केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मौजे मोडवे येथील गुलाब मोटे यांच्या १० शेळ्या, तिन मेंढ्या व १ कुत्रा वीज पडून मयत झालेले आहेत. तालुक्यातील ४ गावात १६९ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

कृषी मंत्र्यांकडूनही काटेवाडी परिसरात पिकांची पाहणी

तत्पूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काटेवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

Web Title: Dycm sunetra pawar inspected damaged areas of baramati area damaged by heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • baramati
  • Heavy Rain
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोल्हापुरात लवकरच उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम
1

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोल्हापुरात लवकरच उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
2

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण
3

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण

Jammu Kashmir Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचे तांडव! भीषण ढगफुटीमुळे १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4

Jammu Kashmir Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचे तांडव! भीषण ढगफुटीमुळे १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.