मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना ईडीचे समन्स(ED Summons) आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी १६ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
[read_also content=”ATM मधून लंपास केले ११ लाख , लुटीचा CCTV व्हिडिओ झाला Viral, ३ दिवस उलटूनही सुरक्षा रक्षकाचा मारेकरी फरारच https://www.navarashtra.com/crime/horrible-wazirabad-crime-ctv-footage-of-robbery-outside-atm-surfaced-accused-still-out-police-not-arrested-yet-nrvb-361580.html”]
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. सोमवारी कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी या, असा आदेश ईडीने चहल यांना समन्सच्या माध्यमातून दिला आहे. ईडीच्या या समन्समुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.
ईडीने इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. “इक्बाल सिंह चहल गेल्या १४० दिवसांपासून संजय राऊत यांच्या पार्टनरला का वाचवत आहेत? हेच समजत नाहीय”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजीत पाटकरव यांनी खुल्लम खुल्ला 100 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्याचं काम इक्बाल सिंह चहल करत आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
[read_also content=”अवैधरित्या केली हरणाची शिकार, पोलिसांनी जप्त केलं मांस ; एका संशयिताला अटक, तपासत आहेत शिकारीमागचं कारण https://www.navarashtra.com/crime/deer-meat-recovered-in-malegaon-crime-one-suspect-arrested-nrvb-361564.html”]
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदानात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.
संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. त्यानंतर आता याच प्रकरणाचा समांतर तपास आता ईडीकडूनही केला जातोय. त्यामुळे या प्रकरणी आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देखील चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.