नवीन मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० देण्याचं आश्वासन दिलं होत. निडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने महायुतीला मोठं यश मिळाल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार असल्याचं शिंदेंनी जाहीर केलं.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली आहे. निवडणुकीत एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्याबळ नाही. लाडक्या बहिणींनी लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला आहे. त्यामुळे हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत १५०० नाही तर २१०० रुपये देणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.