Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन

आषाढी वारीनिमित्त म्हसवड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंचगिरी पांडुरंग महाराज रसाळ सांप्रदायाच्या दिंडीला भेट देत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. "वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा" असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 20, 2026 | 11:49 AM
वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन

वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन

Follow Us
Follow Us:
  • आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांना एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
  • म्हसवड येथे इंचगिरी दिंडीला शिंदे यांची भेट
  • वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा घेतला आढावा
म्हसवड : पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आषाढी वारीमधील लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी म्हसवड तालुका माण येथे केले. आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या विविध दिंड्यामधील वारकऱ्यांच्या सोयी सुविधा बाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांनी म्हसवड येथे इंचगिरी पांडुरंग महाराज रसाळ सांप्रदायाच्या पायी दिंडीला चांदणी चौक म्हसवड येथे भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.

पंढरपूर सातारा मार्गावरील विविध दिंड्या व त्यामधील वारकऱ्यांच्या सोई सुविधेचा आढावा घेण्यासाठी नामदार एकनाथ शिंदे यांचा धावता दौरा आयोजित केला होता. म्हसवड चांदणी चौक येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या इंचगिरी सांप्रदायाच्या पांडुरंग रसाळ महाराज यांच्या नेतृत्वाखालील दिंडीला नामदार एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, रसाळ महाराज दिंडीतील पदाधिकारी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

यावेळी बोलताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले मी पांडुरंगाचा भक्त आहे. इंचगिरी रसाळ महाराज संप्रदाय दिंडीला खूप मोठा वारसा आहे. मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांनी महाराजांचा वसा आणि वारसा अनेक वर्षापासून जपला आहे. हा वारसा ह भ प तुकाराम महाराज रसाळ व ह भ प दिनेश भैय्या रसाळ यांनी ताकतीने पुढे चालवावा व पांडुरंगाने त्यांना शक्ती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भावनिक व आध्यात्मिक आठवणीचे स्मरण केले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म, पांडुरंगावरील श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. 24 तासाच्या कामकाजातील ताणतणाव दूर करण्यासाठी परमेशरावरील श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हीच श्रद्धा आषाढी वारीतील विविध दिंडी मधून येणाऱ्या लाखो भाविकां कडून व्यक्त होत आहे. मी स्वतःला नेता किंवा पुढारी मानत नाही. खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे आणि ही संधी मला पांडुरंगाने दिलेली आहे. कायम तुमच्या ऋणात राहणे , तुम्हाला सहकार्य करणे हे माझे कर्तव्य असल्याचे भावनिक उदगार शिंदे यांनी काढले.

या धावत्या दौऱ्याच्या निमित्ताने नामदार शिंदे यांनी प्रशासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच निवास व्यवस्था इत्यादी बाबत आढावा घेतला. या निमित्ताने दिंडी मालक, व्यवस्थापक व वारकऱ्याशी संवाद साधून तुमच्या प्रत्येक अडचणीत मी सक्रिय व दक्ष असल्याची हमी त्यांनी दिली. तसेच वारकरी व गुरु भक्तांना मोलाचे मार्गदर्शन केले. इंचगिरी रसाळ दिंडी तर्फे शंकर महाराज रसाळ यांनी एकनाथ शिंदे यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला. ह भ प दिनेश भैय्या रसाळ म्हणाले हल्लीच्या लोकशाहीतील विष्णूचा अवतार म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय. पंढरीचा पांडुरंग शिंदे साहेबांच्या पाठीशी असून त्यांचे आगामी राजकीय भविष्य उज्वल असल्याचे दिनेश भैय्या यांनी स्पष्ट केले. “मी वारकऱ्यांचा सेवक आहे. दिंडी व्यवस्थापना संदर्भातील तुमची कोणतीही अडचण सांगा. करतो, बघतो म्हणणारा मी पुढारी नाही. चांगल्या कामासाठी नो रीजन,ऑन दि स्पॉट डिसिजन ही माझी कामाची पद्धत आहे. एकदा या, भेट आणि पहा असे सांगून दिंडीच्या अडचणी बाबत समक्ष भेटण्याचे आश्वासन त्यांनी रसाळ संप्रदायांना दिले”.

Ashadhi Wari 2026: वारीत पाय लागल्यानंतर ‘माऊली, चला पुढे’ का म्हणतात? जाणून घ्या वारकरी परंपरेचे तत्त्वज्ञान

Web Title: Eknath shinde visits warkari dindi mhaswad ashadhi wari pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur wari
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीची हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेची कशी झाली सुरुवात, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीची हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेची कशी झाली सुरुवात, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi Special: भगवान विठ्ठलांच्या गळ्यात वैजयंती माळा का असते, जाणून घ्या त्यामागील कारणे
2

Ashadhi Ekadashi Special: भगवान विठ्ठलांच्या गळ्यात वैजयंती माळा का असते, जाणून घ्या त्यामागील कारणे

Ashadhi Wari 2026: पंढरपूरची चंद्रभागा इतकी पवित्र का मानली जाते? जाणून घ्या वारकरी परंपरेतील विशेष स्थान
3

Ashadhi Wari 2026: पंढरपूरची चंद्रभागा इतकी पवित्र का मानली जाते? जाणून घ्या वारकरी परंपरेतील विशेष स्थान

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
4

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.