Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Yunus Shaikh joins Shiv Sena: मुंब्र्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड समोर आली असून महापालिका निवडणुकीदरम्यान 'कैसे हराया' आणि 'मुंब्रा हिरवा करणार' या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या MIM नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 15, 2026 | 03:20 PM
मोठी राजकीय घडामोड! 'कैसे हराया' फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

मोठी राजकीय घडामोड! 'कैसे हराया' फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Follow Us
Follow Us:
  • मुंब्र्यात मोठी राजकीय घडामोड!
  • MIM नगरसेविका सहर शेख यांचे वडील शिंदेंच्या शिवसेनेत
  • आव्हाडांचे समर्थक ते कट्टर विरोधक
Yunus Shaikh joins Shiv Sena: महापालिका निवडणुकीत ‘कैसे हराया’ आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. युनूस शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, युनूस शेख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याचा दावा फेटाळून लावला असून, ही नियुक्ती आपल्या केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या कार्यालयातील फोटो व्हायरल

युनूस शेख यांचा शिवसेनेच्या कार्यालयातील सत्काराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये त्यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार होताना दिसत आहे. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

युनूस शेख यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख असून, शिवसेना संघटना बळकट करण्यासंबंधीही सूचना आहेत.

‘मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’– युनूस शेख

पक्षप्रवेशाच्या बातम्यांनंतर युनूस शेख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. आपल्या कुटुंबाचा सुमारे ४० वर्षांपासून केबल व्यवसाय असून, इंटरनेट सेवेशीही आपण संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय केबल सेनेतील नियुक्ती ही व्यवसायाशी संबंधित संघटनात्मक जबाबदारी आहे. याचा अर्थ आपण शिवसेना पक्षात प्रवेश केला असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कळवा-मुंब्रा परिसरातील केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना एकत्र आणण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘कैसे हराया’ वक्तव्यामुळे सहर शेख चर्चेत

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर सहर शेख विजयी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर आयोजित सभेत त्यांनी ‘कैसे हराया’ असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला होता. याच भाषणात त्यांनी पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. मात्र, या वक्तव्याचा संदर्भ एमआयएम पक्षाचा हिरवा रंग आणि पक्षविस्ताराशी संबंधित असल्याचे स्पष्टीकरण सहर शेख यांनी दिले होते.

जितेंद्र आव्हाडांचे समर्थक ते राजकीय विरोधक

युनूस शेख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते. ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांनी मुलगी सहर शेख यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या विजयानंतर युनूस शेख आणि सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमधील राजकीय मतभेद उघड झाले होते.

मुंब्र्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा

मुंब्रा-कळवा परिसरात जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय प्रभाव राहिला आहे. त्याच परिसरात एमआयएमच्या सहर शेख यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याने स्थानिक राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली होती. आता युनूस शेख यांची शिवसेनेशी संबंधित केबल संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, त्यांनी स्वतः पक्षप्रवेशाचा दावा नाकारल्याने ही नियुक्ती आणि अधिकृत राजकीय पक्षप्रवेश यांतील फरक महत्त्वाचा ठरतो. युनूस शेख यांच्या नियुक्तीमुळे मुंब्र्यातील स्थानिक राजकारणात पुढे कोणत्या घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?

Web Title: Mim corporator sahar shaikh father yunus shaikh joins eknath shinde shiv sena mumbra politics sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
1

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
2

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!
3

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
4

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.