
Election Commission declares date for Rajya sabha Election 2026, Rajya sabha Election 2026, ,
निवडणूक कार्यक्रमानुसार ८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ९ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ११ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने २० जून २०२६ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. निवडणूक आयॊगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानंतर आता या जागेसाठी कोणाची सरशी लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्त्वचा राजिनामा देत राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात धरली. त्यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागेसाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाने एकूण २४ जागांसाठी राज्यसभा निवडणुकीची तारिख जाहीर केली आहे. जून-जुलै महिन्यात १० राज्यातील राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात प्रत्त्येकी चार जागांसाठी तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी, झारखंड मधे २ आणि मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश मधे प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यासहिवाय महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे.
“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा