देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर 'सर्कस' सुरू _ अंबादास दानवे
देशभरातल्या वाढत्या इंधन दरांवरून नागरिकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव तीनवेळा वाढल्याने परिस्थिती अजून बिकट झाली आहे. ग्रामीण भागात विशेष करून परभणी, हिंगोली, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसतात आहे. यावरूनच आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आंबादास दानवे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर ‘सर्कस’ सुरू असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
राज्ज्यात इंधन टंचाईच्या उद्भवलेल्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणीही इंधनाचा साठा करू नये यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यावरून आता अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून सरकारवर टिकास्त्र सोडलले आहे. ते म्हणाले, “देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग पुरवठा विभाग झोपला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग… pic.twitter.com/S0tVULaaVu — Ambadas Danve (@iambadasdanve) May 23, 2026
ते पुढे म्हणाले, “दुसरीकडे, जालना जिल्ह्यात काल ‘शाही फर्मानाचा’ कळस पाहायला मिळाला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल देणार नाही, असा फर्मान काढण्यात आला. पण जे गरीब शेतकरी नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात, त्यांनी डिझेल कुठून आणायचे, यावर स्पष्टीकरण यात नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन, त्यांच्या हातात ‘हातगाड्या’ देणे, हाच या सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ दिसतोय! व्वा रे महायुती.. अन व्वा रे एनडीए!” अश्या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमांत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलत पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले






