Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-ठाण्यासह, अंबरनाथ-बदलापूरमध्ये सकाळीच बत्ती गुल; महावितरणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यानं वीज पुरवठा झाला खंडीत

महावितरणच्या पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 26, 2022 | 12:36 PM
मुंबई-ठाण्यासह, अंबरनाथ-बदलापूरमध्ये सकाळीच बत्ती गुल; महावितरणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यानं वीज पुरवठा झाला खंडीत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईसह ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये आज सकाळीच बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं. काही तास हा वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. या बिघाडाचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमाला बसला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा पार पडत आहे. त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला.

महावितरणच्या पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.  वीज पुरवठा खंडित झालेल्या काही भागांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बिघाडाचा परिणाम टाटा वीज कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. टाटाकडून मुंबई शहरातील काही भाग आणि उपनगरात वीज पुरवठा करण्यात येतो. या बिघाडामुळे दादर, माहीम, वांद्रे येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या 400KV कळवा ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबई आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजेची मागणी सुरळीत ठेवण्यासाठी काही भागात भारनियमनही केले जाऊ शकते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टाटा पॉवरने म्हटले.

राज्यपालांच्या कार्यक्रमाला फटका

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्काऊट गाईड राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडणार होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आहेत. त्याशिवाय, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वीज पुरवठा खंडित झाला.

Web Title: Electricity power cut in mumbai thane ambarnath and badlapur due to technical failure nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2022 | 12:02 PM

Topics:  

  • Badlapur
  • Mumbai
  • Power cut
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
3

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.