छत्रपती संभाजीनगर : EMMTC आयोजित ATF, AITA, MSLTA यांच्या मान्यतेखाली MSLTA, AITA 14 वर्षांखालील स्पर्धेत क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नवख्या खेळाडूंनी अनेक दिग्गज खेळाडूंना धूळ चारत आपला दबदबा कायम राखला आहे. ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी-एमएसएलटीए एआयटीए 14 वर्षांखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे, आरव मुळ्ये, हरियाणाच्या आरव जखर यांनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला.
मानांकित खेळाडूंवर मात
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकित स्मित उंद्रेने गुजरातच्या चौदाव्या मानांकित कबीर परमारचा 6-3, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. लकी लुझर ठरलेल्या महाराष्ट्राच्या आरव मुळ्येयाने तेलंगणाच्या चौथ्या मानांकित प्रणित रेड्डी दोरागरीचा 6-4, 4-6, 6-4 असा कडवा प्रतिकार करीत सनसनाटी निकालाची नोंद केली.
नवीन खेळाडूंनी दाखवली चमक
हरियाणाच्या आरव जखर याने दुसऱ्या मानांकित पश्चिम बंगालच्या संकल्प सहानीचे आव्हान 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले. अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदेने आपला राज्य सहकारी अंश रमाणीचा 6-0, 6-2 असा पराभव केला. अकराव्या मानांकित प्रज्ञेश शेळकेने छत्रपती संभाजी नगरच्या क्वालिफायर शिवराज जाधवचा 6-0, 4-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीना हिने ओरिसाच्या शजफा केचा 6-1, 6-0 असा पराभव केला. पहिल्या फेरीत कर्नाटकच्या आद्या चौरसियाने महाराष्ट्राच्या आयुश्री तरंगेला 7-5, 6-3 असे पराभूत केले.
निकाल : मुख्य ड्रॉ : दुसरी फेरी : मुले :
आराध्य म्हसदे[1] (महा) वि.वि.अंश रमाणी (महा)6-0, 6-2;
आरव जखर(हरियाणा)वि.वि.संकल्प सहानी[2](पश्चिम बंगाल) 6-4, 6-2;
स्मित उंद्रे (महा) वि.वि.कबीर परमार [14](गुजरात) 6-3, 6-3;
वनिज पोथुनूरी[12](तेलंगणा) वि.वि.सत्या चिंतागुंता (तेलंगणा) 6-0, 6-0;
विराज चौधरी[7](दिल्ली) वि.वि.आरव पटेल 6-4, 6-1;
आरव छल्लानी[15](महा) वि.वि.वृषांक मुनुगला(तेलंगणा)6-4, 6-2;
वरद उंद्रे[9](महा) वि.वि.ध्रुव सेहगल(महा) 6-3, 6-1;
परंजय सिवाच[6](हरियाणा) वि.वि.कौस्तुभ सिंग(उत्तर प्रदेश)4-6, 7-5, 6-3;
अथर्व श्रीरामोजू([8](तेलंगणा) वि.वि. हेमदेव महेश (तामिळनाडू)7-5, 6-0;
प्रद्न्येश शेळके [11](महा) वि.वि. शिवराज जाधव (महा) 6-0, 4-6, 6-4;
पुनीत एम(कर्नाटक)वि.वि.दैविक काल्वाकुंता 6-0, 6-1;
आरव मुळ्ये(महा)वि.वि.प्रणित रेड्डी दोरागरी[4](तेलंगणा) 6-4, 4-6, 6-4;
दक्ष पाटील[5](महा)वि.वि.श्रेयांश खीरा(हरियाणा) 6-1, 6-1;
अर्जुन मणिकंदन(कर्नाटक)वि.वि.तनिश नंदा(पंजाब) 6-4, 6-4;
मुली : दुसरी फेरी :
आराध्या मीना[1](राजस्थान)वि.वि.शजफा के(ओरिसा)6-1, 6-0;
पहिली फेरी:
अनिहा गविनोल्ला(तेलंगणा)वि.वि.ईशल पठाण(महा)7-6(1), 4-6, 6-3;
कीर्तीयानी घाटकर(महा)वि.वि.सना सेश वर्धमानी(कर्नाटक)4-6, 6-4, 6-3;
राबिया दुल्लेत(पंजाब)वि.वि. अनिका नायर(महा) 6-3, 6-0;
आद्या चौरसिया(कर्नाटक) वि.वि.आयुश्री तरंगे(महा) 7-5, 6-3;
हेही वाचा : ICC टेस्ट रॅंकींगमध्ये ऋषभ पंतची मोठी झेप; टॉप-20 मधून रोहित-विराटसुद्धा बाहेर; बाबर आझमदेखील पडला मागे
हेही वाचा : पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धा; करणदीप कोचर आणि क्षितिज नावेद कौल यांची संयुक्त आघाडी