Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस

पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 03:25 PM
कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस

कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस

Follow Us
Follow Us:

राज्य सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना’ जाहीर केली असताना दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जवसुलीसाठी न्यायालयाची नोटीस पाठविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुसद व महागाव तालुक्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांना लोकन्यायालयात उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी स्पष्ट न झाल्यामुळे बँका अजूनही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Iran Israel युद्धामुळे कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत; खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद…

पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही अशा प्रकारे न्यायालयाच्या माध्यमातून वसुलीचा तगादा लावण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, वन्यजीवांचा त्रास, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेले भाव यामुळे शेती आधीच तोट्याची झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा वाढत असून शासनाने कर्जमुक्तीची घोषणा करूनही बँकांकडून वसुली सुरू असल्याने शेतकऱ्यात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही राष्ट्रीयकृत बँका लोकन्यायालयात केसेस दाखल करत असतील तर शासन व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट होते.

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा

८ कर्जमुक्तीची घोषणा करूनही बँकांकडून न्यायालयाच्या नोटीस पाठविल्या जात आहेत, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यावर ही पठाणी वसुली आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करूनही कारवाई थांबवली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, मनीष जाधव, शेतकरी नेते, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Even after the declaration of debt relief the collection is still in trouble notice from banks to loan farmers in pusad inflation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • farmer
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण
1

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
2

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
3

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप
4

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.