Farmer Leader Raghunath Patils Entry Into Brs Party Nrab
शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा बी.आर.एस.पक्षात प्रवेश
शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूरात मेळावा घेणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.सी. राव यांनी केली.
इस्लामपूर : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूरात मेळावा घेणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.सी. राव यांनी केली.
साखराळे ( ता. वाळवा) येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी सदिच्छा भेट दिली. रघुनाथदादा पाटील यांनी प्रमुख सहकाऱ्यांसमवेत बी. आर. एस. पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री के सी राव यांनी रघुनाथदादांच्या गळ्यात बीआरएस पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत केले. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी अब की बार किसान सरकार, रघुनाथदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. के.सी. राव यांनी रघुनाथदादांच्या घरी स्नेहभोजन केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
रघुनाथदादा पाटील म्हणाले,बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आहे. के.सी. राव यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा झाली. अनेक प्रश्नांची समर्पक उत्तर मिळाल्यानंतर पक्षात प्रवेश केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारा व त्यांचे प्रश्न सोडविणार एकही राजकीय पक्ष महाराष्ट्रात नाही. बीआरएसपक्षा तेलंगणातील शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत दिले असून अनेक सवलतीही दिल्या आहेत. त्यामुळे देशात केवळ हाच पक्ष शेतकऱ्यांना न्याय देईल अशी आमची धारणा झाली आहे. महात्मा गांधींनी ९ ऑगस्टला इंग्रजांना भारत छोड़ो असे सांगितले होते. संपूर्ण राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूरातून सर्व भ्रष्ट राजकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना महाराष्ट्र छोडो असे सांगणार आहे. यावेळी भगीरथ भालके, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अॅड. अजित काळे, बी.जी.पाटील, हणमंतराव पाटील, शंकर मोहिते, गणेश शेवाळे, लक्ष्मण पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Farmer leader raghunath patils entry into brs party nrab