Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चिनी बनावटीचे CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याच्या कथित प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सरकारला थेट सवाल उपस्थित केला. मंदिराच्या सुरक्षेशी तडजोड झाली का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 02:43 PM
'आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?' चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

'आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?' चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड झाली का?’
  • चिनी सीसीटीव्ही प्रकरणी सरकारला आमदार कैलास पाटील यांचा थेट सवाल
  • एसआयटी चौकशीची जोरदार मागणी
 

धाराशिव : विधानसभा पावसाळी अधिवेशनात धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. तुळजापूर शहरात चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा आरोप करत, “हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड झाली का?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ७ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्राद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव काही चिनी कंपन्यांच्या सीसीटीव्ही प्रणालींवर निर्बंध घातले आहेत. तसेच STQC मान्यताप्राप्त कंपन्यांचेच कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुळजापूर शहरातील तब्बल ६७ ठिकाणी ‘युनिव्हियू’ (Uniview) कंपनीचे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राच्या कोट्यवधी भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. गृह विभागाच्या अखत्यारीत हे काम होत असताना केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष का करण्यात आले?” असा सवाल त्यांनी सरकारला केला.

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा …

इतिहासाचा दाखला देताना त्यांनी १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी तुळजाभवानीच्या मूर्तीचे संरक्षण करणाऱ्या स्थानिक पुजारी व तुळजापूरकरांच्या शौर्याची आठवण करून दिली. “त्या काळात देवीचे रक्षण झाले; मात्र आज हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळातच मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचाही उल्लेख करत त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चिनी कंपनीच्या सर्व्हरद्वारे संवेदनशील माहिती परदेशात जाण्याचा धोका असल्याचा दावा करत, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहातून केली.

दरम्यान, राज्यातील विविध लोकहिताच्या प्रश्नांसह धाराशिव जिल्ह्यातील ज्वलंत समस्याही आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने मांडल्या असून, जनतेच्या प्रश्नांना सभागृहात प्रभावीपणे वाचा फोडत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Exclusive: ‘आई तुळजाभवानी‘च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत …

आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख मागण्या

तुळजापूरातील चिनी सीसीटीव्ही प्रकरणाची एसआयटी चौकशी.
केंद्र सरकारच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणी केले, याची चौकशी.
जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई.
तुळजाभवानी मंदिर परिसरात केवळ मान्यताप्राप्त व सुरक्षित सीसीटीव्ही प्रणालीच वापरण्याची अंमलबजावणी.

Web Title: Kailas patil demands sit probe over chinese cctv at tuljabhavani temple news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Kailas Patil
  • maharashtra

संबंधित बातम्या

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी; १५ दिवसांत अहवालासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
1

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी; १५ दिवसांत अहवालासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
2

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार
3

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
4

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.