Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यांना पाच वर्षांची हमी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पावसाळ्यातील खड्डे आणि सेवा वाहिन्यांमुळे उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा 42.36 कोटी रुपयांचे टेंडर काढल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 11:57 AM
'पाच वर्षांची हमी' कुठे गेली? रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा 42 कोटींचा खर्च; मीरा-भाईंदर पालिकेवर प्रश्नचिन्ह

'पाच वर्षांची हमी' कुठे गेली? रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा 42 कोटींचा खर्च; मीरा-भाईंदर पालिकेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे
  • मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
  • मीरा-भाईंदर पालिकेच्या 42.36 कोटींच्या नव्या टेंडरवरून वाद
विजय काते, मिरा-भाईंदर : “450 कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले”, “पाच वर्षांची हमी दिली” अशा मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासनाचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील विविध सेवा वाहिन्यांनी खोदलेले रस्ते आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने तब्बल 42 कोटी 36 लाख रुपयांचे टेंडर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जर 450 कोटी रुपये खर्चून झालेले रस्ते अजूनही पाच वर्षांच्या हमी कालावधीत असतील, तर त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा जनतेच्या कराच्या पैशातून 42 कोटी रुपये खर्च करण्याची गरजच काय? हमी केवळ कागदावर होती का? की निकृष्ट दर्जाच्या कामांना अधिकाऱ्यांनीच अभय दिले? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

महापालिकेच्या निविदेनुसार शहरातील विविध सेवा वाहिन्यांनी खोदलेले रस्ते आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे वार्षिक पद्धतीने दुरुस्त केले जाणार आहेत. मात्र, प्रत्येक वर्षी याच कारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि पुढच्या पावसात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. मग एवढा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्ते उखडले तर जबाबदार कंत्राटदारांवर कारवाई झाली का? हमी कालावधीत त्यांच्याकडून मोफत दुरुस्ती करून घेतली का? निकृष्ट कामांना मंजुरी देणाऱ्या अभियंत्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली? की सर्व काही “कागदोपत्री” सुरळीत असल्याचे दाखवून पुन्हा नव्या टेंडरद्वारे जनतेच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे?

शहरातील नागरिक रोज खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरे जात आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे. वाहतूक कोंडी वाढत आहे. तरीही प्रशासनाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात; पण त्यांचा दर्जा टिकत नसेल, तर त्या कामांची जबाबदारी कोण घेणार? आता वेळ आली आहे ती केवळ खड्डे बुजवण्याची नाही, तर निकृष्ट कामांची चौकशी, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे, संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि 450 कोटींच्या रस्त्यांचे गुणवत्ता परीक्षण सार्वजनिक करणे आवश्यक आहे. अन्यथा, “रस्ते बांधा, खड्डे पडू द्या आणि पुन्हा कोट्यवधींचे टेंडर काढा” हीच मीरा-भाईंदर महापालिकेची कार्यपद्धती असल्याचा नागरिकांचा संशय आणखी बळावणार आहे.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना! २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला; महिलेसह चार जण जखमी

Web Title: Mira bhayandar road repair tender 42 crore road guarantee controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • thane

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
1

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
2

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
3

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
4

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.